Next
‘रक्तदान हे माणसाला माणूस जोडणारे आहे’
डॉ. अनिल अवचट यांचे मत
BOI
Saturday, December 01, 2018 | 04:41 PM
15 0 0
Share this story

‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे आयोजित सन्मान रक्तदूतांचा कार्यक्रमाप्रसंगी राम बांगड, डॉ. अनिल अवचट, डॉ. किशोर पुजारी, मकरंद टिल्लू, डॉ. नीता मुन्शी, डॉ. स्नेहल मुजुमदार व डॉ. संजय पठारे.

पुणे : ‘रक्तदान हे माणसाला माणूस जोडणारे आहे. आपण एकमेकांची मदत करणे,एकमेकांना सहकार्य करत राहणे महत्त्वाचे असून, अशा कामातूनच आपण मोठ्या विश्वात जोडले जातो’, असे मत समाजसुधारक व मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. रुबी हॉल क्लिनिकचे संस्थापक कै. डॉ. के. बी. ग्रांट यांच्या ९८व्या जयंती निमित्त ‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे सन्मान रक्तदूतांचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. 

या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर संयोजक, रक्तदाते, रूबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर्स आणि ब्लड बँक युनिटचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला प्रमाणित योग हास्य प्रशिक्षक मकरंद टिल्लू हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात मकरंद टिल्लू यांनी तणावमुक्त जीवनासाठी ‘आर्ट ऑफ लाफींग’ ही विशेष कार्यशाळा घेतली. 

या कार्यक्रमादरम्यान डॉ. अनिल अवचट यांचा एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये कन्सल्टंट डॉक्टर आणि रक्तदान शिबिर संयोजक, सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांचे अनुभव सांगितले. या परिसंवादात रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे, रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. किशोर पुजारी, रूबी हॉल क्लिनिकच्या ब्लड बँकेच्या संचालिका डॉ. स्नेहल मुजुमदार, पॅथॉलॉजी लॅबच्या संचालिका व थॅलेसेमिया सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. नीता मुन्शी, कार्डियाक अॅुनेस्थेशिया अँड रिकव्हरी विभागाचे संचालक डॉ. बिकाश साहू, रक्ताचे नातेचे संस्थापक राम बांगड, आयसीयुच्या संचालिका डॉ. प्राची साठे आणि नर्सिंग विभागाचे संचालक लेफ्टनंट कर्नल सीसी क्रूझ यांचा समावेश होता. या कार्यक्रमात शंभरहून अधिक रक्तदान शिबिर संयोजक उपस्थित होते.

रूबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे म्हणाले, ‘वैद्यकीय सेवा ही अत्यंत संवेदनशील असते. कोणत्याही रूग्णाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय सेवा खंडीत न होता उपचार मिळावेत. त्यांना योग्य वेळी सुरक्षित रक्त मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.’

डॉ. किशोर पुजारी म्हणाले, ‘रक्त हे वैद्यकीय सेवेतील अविभाज्य घटक असून, रक्तपेढीमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि प्रणालीसाठी आम्ही कायम कटिबध्द आहोत.’

नर्सिंग विभाग संचालक लेफ्टनंट कर्नल सीसी क्रूझ म्हणाल्या, ‘रूग्णांपर्यंत योग्य रितीने योग्य वेळी रक्त पोहोचण्यामध्ये पारिचारिकांचा महत्त्वाचा वाटा असतो. यासाठी आम्ही नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना विशेष प्रशिक्षण देतो. हे सर्व कामकाज अचूकतेने पार पडावे व कागदपत्रांमध्ये व इतर गोष्टींमध्ये कुठलीही चूक होऊ नये;तसेच योग्य रक्त योग्य व्यक्तीला पोहोचले आहे याची फेरतपासणी आमच्या येथे प्रस्थापित हिमोव्हिजिलंग्स प्रणालीद्वारे केली जाते.

रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले, ‘आतापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली असली, तरी रक्ताला दुसरा पर्याय नाही, ते तयार करता येत नाही. त्यामुळेच रक्तदान करणे हे एक महान कार्य आहे. त्यामुळे असंख्य जीव वाचतात आणि त्यांच्या कुटुंबियांना आनंद मिळतो.रक्तदान शिबिरांचे संयोजक आणि रक्तदात्यांना आम्ही त्यांच्या ऐच्छिक कृत्यांसाठी सलाम करतो. अशा दात्यांमुळे मानवता अजूनही जिवंत आहे, याची आपल्याला अनुभूती होते आणि गरजू रूग्ण या देवदूतांमळे संकटाच्या काळातही बाहेर पडू शकतात.’

या वेळी बोलताना आयसीयूच्या संचालिका डॉ. प्राची साठे म्हणाल्या, ‘आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी धावून येणार्याळ लोकांकडे बघून माणूसकीचे दर्शन आम्हाला अनेक वेळा होत असते.’

आपत्कालीन परिस्थितीमध्ये ‘रक्ताचे नाते’ या संस्थेशी जोडले गेलेले रक्तदाते पुढे येऊन मदत करतात. याबाबत  ‘रक्ताचे नाते’चे संस्थापक राम बांगड यांनी माहिती दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link