Next
‘अथश्री’च्या ‘रंगतरंग’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण
ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनी केले स्पर्धकांचे कौतुक
BOI
Wednesday, July 24, 2019 | 01:19 PM
15 0 0
Share this article:


पुणे : येथील अथश्री फाउंडेशनतर्फे खास ज्येष्ठांसाठी ‘रंगतरंग’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच भूगाव येथील फॉरेस्ट ट्रेल्स येथे ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्या उपस्थितीत झाला.

या वेळी ज्येष्ठ क्रिकेटपटू सदानंद मोहोळ, परांजपे स्कीम्स (कन्सट्रक्शन) लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे आणि फॉरेस्ट ट्रेल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदेश खटावकर उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असून, ‘रंगतरंग’चे हे तिसरे वर्ष होते. या वर्षी या स्पर्धेत ५००हून अधिक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्यासाठी कॅरम, ब्रिज, बुद्धिबळ, टेबल टेनिस आदी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.  

या स्पर्धेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी क्रीडा स्पर्धांसाठीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा अथश्री फाउंडेशनचा प्रयत्न असून, दर वर्षी या स्पर्धेला वाढता प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमातील क्रीडा स्पर्धांसाठी पुणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन, पुणे पूल टेबल असोसिएशन, पुणे डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन, पुणे रिजन ब्रिज असोसिएशन यांचे सहकार्य लाभले होते.   

अथश्री फाउंडेशन ही परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रकशऩ) लिमिटेड यांची विना नफा तत्त्वावर ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करीत असलेली संस्था आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या सामाजिक उन्नतीसाठी संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. संस्थेद्वारे ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आदींविषयी जनजागृती करण्यात येते.  ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने, सुखी-समाधानाने आणि आनंदाने जगता यावे, त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी आणि ते उतारवयातही सक्षम व्हावेत यासाठी संस्था कार्यरत असते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search