Next
‘मोबिक्विक’ने ‘पिवोटचेन’मध्ये गुंतवले दोन कोटी
प्रेस रिलीज
Tuesday, June 26 | 04:37 PM
15 0 0
Share this story

पुणे : फिनटेक पोर्टफोलिओ आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने भारताच्या अग्रणी फूल स्टॅक फिनटेक प्लॅटफॉर्म असलेल्या ‘मोबिक्विक’ने पुणे येथील डाटा विज्ञान कंपनी ‘पिवोटचेन सोल्यूशन्स’मध्ये दोन कोटी रुपयांच्या धोरणात्मक गुंतवणुकीची घोषणा केली.

‘पिवोटचेन’ ही एक सूचक विश्लेषणात्मक कंपनी आहे, जी यांत्रिक शिकवण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये पुढे आहे. त्यांनी ‘मोबिक्विक’साठी विशेष एआय आणि सखोल शिकवण नमुन्यांची निर्मिती केली आहे. हे नमुने ‘मोबिक्विक’साठी महत्त्वपूर्ण ठरतील, कारण ते त्यांच्या युजरच्या पत गरजा पूर्ण करण्यास विविध कर्ज उत्पादने सादर करीत आहेत.

धोरणात्मक गुंतवणुकीबद्दल बोलताना ‘मोबिक्विक’ संस्थापक आणि सीईओ बिपीन प्रीत सिंह म्हणाले, ‘अग्रणी डिजिटल पेमेंट प्रदात्यापासून, तर भारताच्या सर्वात मोठ्या डिजिटल वित्तीय सेवा मंचपर्यंत ‘मोबिक्विक’चे रूपांतर होत आहे. उच्च दर्जाची फिनटेक उत्पादने सादर करण्यास डाटावर प्रचंड एकाग्र व्हावे लागते आणि संपूर्ण श्रेणींमध्ये युजरच्या गरजांचे सखोल ज्ञान ठेवावे लागते. ‘पिवोटचेन’ सध्या अल्टरनेट डाटा स्कोरिंग, सूचक मॉडेलिंग आणि जोखीम व्यवस्थापनामध्ये लक्षणीय कार्य करीत आहे आणि या गुंतवणुकीद्वारे आम्ही अन्य स्पर्धकांपेक्षा निश्चितच उत्तम ठरू शकतो. आमच्या व्यवसायामध्ये मूल्याची भर घालणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे आम्ही सुरूच ठेवू.’

‘मोबिक्विक कुटुंबाचा भाग होऊन आम्हाला आनंद झाला आहे. पेमेंट उद्योगामध्ये ‘मोबिक्विक’ आघाडीवर आहे आणि ‘मोबिक्विक’ सोबत काम करण्यास आणि युजरना योग्य कर्जात्मक सेवा प्रदान करण्यास आम्ही उत्सुक आहोत’, असे ‘पिवोटचेन सोल्यूशन्स’चे संस्थापक आणि सीईओ दीपक राव यांनी सांगितले.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link