Next
गगन नारंग फाउंडेशनतर्फे नेमबाजी पंच प्रमाणपत्र अभ्यासक्रम
BOI
Friday, April 12, 2019 | 12:42 PM
15 0 0
Share this article:


पुणे : नेमबाजी या खेळाला अधिक प्रोत्साहन मिळावे आणि उत्तम नेमबाज खेळाडू व प्रशिक्षकांबरोबर नेमबाजी पंचांचीही फळी भारतात तयार व्हावी या उद्देशाने गगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनतर्फे (जीएनएसपीएफ) रायफल-पिस्टल आणि शॉटगन या नेमबाजी प्रकारांसाठी ‘आयएसएसएफ बी- कोर्स’ हा पंच प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

गगन नारंग
या कार्यक्रमासाठी ‘नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया’चे (एनआरएआय) मार्गदर्शन लाभले असून, ‘इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन’च्या (आयएसएसएफ) सहकार्याने हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. बालेवाडी येथे या अभ्यासक्रमास सुरूवात झाली आहे. ११ ते १६ एप्रिल दरम्यान चालणाऱ्या रायफल व पिस्टल पंच प्रशिक्षणात युनायटेड किंग्डम येथील आयएसएसएफ रायफल कमिटीचे अध्यक्ष व प्रसिद्ध प्रशिक्षक डेविड गुडफेलो व नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे मानद सहमहासचिव व ‘आयएफएफएस जजेस कमिटी’चे सदस्य पवन सिंह प्रशिक्षण देणार आहेत, तर १८ ते २२ एप्रिल दरम्यान चालणाऱ्या शॉटगन पंच प्रशिक्षणात नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे महासचिव डी. व्ही. सीतारामा राव आणि सायप्रस येथील यानीस हेराक्लस प्रशिक्षण देणार आहेत. या अभ्यासक्रमात देशभरातून आलेल्या निवडक व्यक्तींनी सहभाग घेतला आहे.

या वेळी गगन नारंग म्हणाले, ‘नेमबाजी खेळाच्या प्रगतीसाठी आम्ही नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या मदतीने नेमबाजांसाठी काम करतो. आता सुरू होत असलेल्या नेमबाजी प्रमाणपत्र अभ्यासक्रमामुळे या खेळाची सर्वांगीण प्रगती होण्यास हातभार लागणार आहे.’

पवन सिंह
पवन सिंह म्हणाले, ‘संस्थेला ‘आयएसएसएफ’ पंच प्रमाणपत्र अभ्यासक्रमासारखा प्रतिष्ठा लाभलेला अभ्यासक्रम आयोजित करण्याची संधी मिळणे ही संस्थेसाठी सन्मानाची गोष्ट आहे.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search