Next
व्यंकय्या नायडू यांच्याकडून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची पाहणी
प्रेस रिलीज
Saturday, April 27, 2019 | 01:31 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी २६ एप्रिल २०१९ रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची पाहणी केली. या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव उपस्थित होते.

भारतीय चित्रपटांवर आधारित हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. व्हिज्युअल्स, एक्सीबीट्स, ग्राफीक, मल्टीमीडिया,  इंटरॅक्टिवचा समावेश असलेल्या संग्रहालयाच्या माध्यमातून भारतीय चित्रपट सृष्टीचा गौरवशाली प्रवास मांडण्यात आला आहे.

‘चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून सामाजिक विकास, शिक्षण आणि मनोरंजनासाठी मदत होत असते. त्यासाठी चित्रपट पाहिले पाहिजे. अतिशय सुंदर असे संग्रहालय उभारण्यात आले आहे. संग्रहालय पाहून खूप आनंद झाला या संग्रहालयाला सर्वांनी  भेट द्यावी,’ असे उपराष्ट्रपती नायडू यांनी या वेळी सांगितले.


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search