Next
श्रेयस बोंबले, श्रुती जाधव यांची कर्णधारपदी निवड
प्रेस रिलीज
Tuesday, June 05, 2018 | 05:24 PM
15 0 0
Share this article:

श्रेयस बोंबले
पुणे : राजस्थान रोलबॉल संघटनेच्या वतीने हनुमानगड संगरिया  (राजस्थान)  येथे आठ ते दहा जून दरम्यान १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटाच्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत मुलांच्या २५ तर मुलींच्या २० संघांचा समावेश करण्यात आला आहे.

श्रुती जाधव
‘महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाचा कर्णधार म्हणून पुण्याच्या श्रेयस बोंबले याची तर, मुलींच्या संघाची कर्णधार म्हणून ठाण्याच्या श्रुती जाधवची निवड करण्यात आली आहे’, असे महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे सचिव राजू दाभाडे यांनी  सांगितले. 

महाराष्ट्राच्या मुलांच्या संघात श्रेयस बोंबले (कर्णधार, पुणे), आदित्य सुतार, रोहन पाटील, वेदांत घाटे  (कोल्हापूर), गौतम पटेल (जळगाव), अमितेश बोधडे (यवतमाळ), सोहम पवार, पार्थ गायकर,  अगम शहा, मधुसुधन रत्नपारखी (पुणे), हर्षल घुगे (अहमदनगर), अथर्व बिहाडे (चंद्रपूर) यांचा सामावेश असून, प्रशिक्षक प्रभाकर वडवेराव आहेत तर, व्यवस्थापक जयप्रकाश सिंग आहेत. 

मुलींच्या संघात श्रुती जाधव (कर्णधार, ठाणे) श्रुती भगत, सृष्टी भोयर (चंद्रपूर), सुहानी सिंग, भक्ती मलशिखरे, सेजल टोळे (पुणे), सृष्टी संचेती, पूर्वा उपाध्ये (अहमदनगर), रिद्धी सिंघवी, ऐश्वर्या गोवर्धने (नाशिक), प्राची देवकाते (मुंबई), सृष्टी जाधव (कोल्हापूर) यांचा समावेश आहे. या संघाचे  प्रशिक्षक आनंद पाटेकर आणि व्यवस्थापक पल्लवी शिंदे आहेत.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search