Next
सनी देओलच्या मुलाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
BOI
Saturday, February 16, 2019 | 06:08 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : अभिनेता सनी देओल सध्या खूप खूश आहे. कारण त्याचा मोठा मुलगा करण देओल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आगामी ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून करण बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. आपल्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण असल्याचे सनी देओलने म्हटले आहे.

आपल्या ट्विटर अकाउंटवरून करणच्या या चित्रपटाची माहिती देऊन हा चित्रपट १९ जुलैला प्रदर्शित होणार असल्याचे सनी देओलने सांगितले आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक या नात्याने सनीने चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. हा चित्रपट एक साहसी प्रेमकथा असेल, असेही त्याने सांगितले आहे. 

आपल्या मुलाबाबत आणि चित्रपटाबाबत माहिती देताना सनी देओलने आणखी एका नवीन चेहऱ्याची ओळख करून दिली आहे. साहिर बाम्बा ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटात करण देओलची नायिका असणार आहे. याशिवाय १९७३मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेते धर्मेंद्र यांच्या ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटातील ‘पल पल दिल के पास..’ या लोकप्रिय गाण्यावरून या चित्रपटाचे नाव ठेवले असल्याचेही सनी देओलने सांगितले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search