Next
रोपळे शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा
BOI
Friday, June 21, 2019 | 05:12 PM
15 0 0
Share this article:



सोलापूर :
रोपळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा झाला. ३२५ विद्यार्थ्यांनी या वेळी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगासने केली.



पंढरपूर तालुक्यात गुणवत्तेत नेहमीच अग्रेसर राहिलेल्या प्राथमिक शाळेत नेहमीच विविध उपक्रम सादर केले जातात. आंतरराष्ट्रीय योगदिनी चिमुकल्यांनी विविध प्रकारची योगासने, प्राणायाम व सूर्यनमस्कार सादर केले. या शाळेत दररोजच प्रार्थनेच्या वेळी योग व प्राणायाम विद्यार्थ्यांकडून करून घेतले जातात. प्रत्येक योगासन, प्राणायाम आणि सूर्यनमस्काराचे आरोग्य व बुद्धीसाठी काय काय फायदे होतात, याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. त्यामुळे या प्रशालेतील मुले आवडीने योगासनांचे धडे गिरवतात. 



‘हसत-खेळत अध्यापन व नियमित योगासने घेतली जात असल्यामुळे विद्यार्थांच्या गैरहजेरीचे प्रमाण फारच कमी झाले आहे,’ असे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मिनी व्यवहारे, अरुण माळी, शशी कांबळे, तानाजी ढेकळे, प्रमोद लोणारकर, समाधान आयरे, वैशाली जगताप, वर्षाराणी गोडसे, छाया समलखांब, कल्पना माने, शिवाजी आढवळकर यांनी परिश्रम घेतले.













(योगासनांची शास्त्रीय माहिती आणि शास्त्रशुद्ध प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. नेहमी योगासने करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून त्याचा उपयोग होऊ शकेल.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Suresh khandekar Umadi About 24 Days ago
Super team work good active ties
0
0

Select Language
Share Link
 
Search