Next
रोपळे गावातील शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
BOI
Monday, June 17, 2019 | 05:22 PM
15 0 0
Share this article:



सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये उन्हाळी सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस १७ जून रोजी उत्साहात पार पडला. रोपळे (ता. पंढरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. 

विद्यार्थ्यांना नवी पुस्तके देण्यात आली. नवी पुस्तके आणि एकंदरच सगळ्याने नवलाईने मुले हरखून गेली होती. नवागत विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूकही काढण्यात आली. 



या वेळी सरपंच दिनकर कदम, नारायण गायकवाड, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक विलास भोसले, बाळासाहेब भोसले, ‘रयत’चे बाळासाहेब पाटील, विलास (ल.) भोसले, मुख्याध्यापक सुनील शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सारिका भोसले, सिद्धेश्वर भोसले, शिवाजी बिस्किटे आदी मान्यवर उपस्थित होते.



कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद लोणारकर, अरुण लोखंडे, पद्मिनी व्यवहारे, वैशाली जगताप, अजिनाथ पवार, तानाजी ढेकळे, शशिकांत कांबळे, समाधान आयरे, वर्षाराणी गोडसे, छाया समलखांब या शिक्षकवर्गाने परिश्रम घेतले. मुख्याध्यापक श्री. शिंदे यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Suresh khandekar Umadi About 87 Days ago
Very nice unforgotten
0
0
Arun Mali.. Tal. PANDHARPUR. Dist Solapur About 90 Days ago
Khup khup Chhan.
1
0

Select Language
Share Link
 
Search