Next
नारद
BOI
Friday, August 10 | 10:24 AM
15 0 0
Share this story

पुराणकाळात सर्वत्र संचार करणारी नारदाची व्यक्तिरेखा आजच्या काळातही आकर्षित करते. या व्यक्तिरेखेवर विस्ताराने क्वचितच कोणी लिहिले असावे. डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी नारदाच्या जीवनावर आधारित लिहिलेली ही कादंबरी आहे.

या कादंबरीचे लेखन करताना वेद, उपनिषदे, पुराने आणि आर्श महाकाव्ये यांतील कथांचा वापर त्यांनी केला आहे. नारद आणि व्यास यांच्यातील संपूर्ण काल्पनिक संवाद स्वरूपात या कादंबरीचे लेखन केले आहे. सर्वसामन्यांच्या मनात येणारे प्रश्न व्यास नारदाला विचारात आहेत, असे या कथानकाचे स्वरूप आहे. या प्रश्नांमध्ये अध्यात्मशास्त्र, विश्वोत्पत्ती, पाप-पुण्य, देवाचे अस्तित्व, वेद, पुराणे, महाकाव्ये आणि धार्मिक ग्रंथ यांच्यातील पारमार्थिक विषयांबद्दल अनेक शंका आपल्या मनात येतात. या शंकाचे निरसन व्यास नारदांना विचारून व्यक्तिमत्त्व कादंबरीतून आपल्यासमोर उभे राहते.

प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन
पाने : ३१२ 
किंमत : ३३० रुपये
     
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link