Next
‘दोशी नाट्यमहोत्सव’ १९ फेब्रुवारीपासून
प्रेस रिलीज
Saturday, February 03 | 05:47 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथे गेली दहा वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येणारा विनोद दोशी नाट्यमहोत्सव १९ ते २३ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

मोबाइल फोनच्या स्क्रीनवर घुटमळणाऱ्या आजच्या जगात खरे अनुभव अभावानेच मिळतात. अशा वातावरणात नाटकसंस्कृती जिवंत ठेवण्याचे काम हा महोत्सव करत आहे. प्रख्यात उद्योगपती आणि कलाप्रेमी विनोद दोशी यांच्या स्मृत्यर्थ या महोत्सवाची सुरुवात झाली. यात एक दशक भारतातील उत्तमोत्तम नाटके माचीत केली गेली. हा नाट्यमहोत्सव संपूर्ण महाराष्ट्रातील नाट्यरसिकांसाठी एक पर्वणीच आहे.

गेल्या दशकात महोत्सवात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, पंजाबी भाषेतील आणि काही गैर-भाषिक नाटके सादर केली गेली. विजय तेंडुलकर, मोहन राकेश, इस्मत चुगताई, गिरीश कार्नाड, सई परांजपे, नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक-शाह, कुमुद मिश्रा, रघुबीर यादव, पल्लवी अरुण, सुनील शानबाग आणि इरावती कर्वे यांसारखे कलावंत या व्यासपीठावरून गेले आहेत. विशेष म्हणजे ‘गजब कहाणी’, ‘उणे पुरे शहर एक’, ‘सिंधू सुधाकर रम’ ही आणि यांसारखी भारतातील सर्वोत्कृष्ट नाटके येथे सादर झाली आहेत.

यावर्षीच्या महोत्सवाची सुरुवात सतीश आळेकर लिखित व दिग्दर्शित ‘महानिर्वाण’ या नाटकाने होणार असून, हे नाटक महोत्सवासाठी खास निर्मिती आहे. हे नाटक १० वर्षांपूर्वी थिएटर अकादमीने सादर केले होते. २०१८मध्ये नाटक कंपनी ते सादर करीत आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तमाशा थियेटर प्रस्तुत व सुनील शानबाग दिग्दर्शित 'Words have been uttered' हे वेगळ्या धाटणीचे नाटक सादर होणार आहे. हे नाटक सांस्कृतिक अभिव्यक्तीचा उपयोग करून साम्राज्याचा किंवा राजवटीचा निषेध यापूर्वी  कसा केलाय याचा आढावा घेते. तिसऱ्या दिवशी पूर्वा नरेश लिखित दिग्दर्शित हिंदी संगीतिका ‘बंदिश २०-२०,००० हर्ट्झ’ सादर होईल.

२२ फेब्रुवारीला नवी दिल्लीच्या कठकता संस्थेचे ‘महाभारत’ एका वेगळ्या दृष्टीकोनातून सादर होईल. हे नाटक अनुरूपा रॉय दिग्दर्शित असून त्यात त्यांनी ‘बुनराकू’ या जपानी कठपुतळी कलेचा उपयोग केला आहे. १०व्या महोत्सवात शेवटी गिरीश कर्नाड लिखित ‘ययाती’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. हे नाटक बेंगळूरू मधील जाग्रीती थिएटरच्या अरुंधती राजा यांनी दिग्दर्शित केले आहे. ‘ययाती’चा इंग्रजी प्रयोग प्रथमच पुण्यात सादर होणार आहे.

यापूर्वी पुणे, मुंबई, बंगळुरू, नवी दिल्ली, कोलकाता, जयपूर, कणकवली आणि इम्फाळ यासारख्या ठिकाणांहून आलेल्या विविध भाषिक नाटकांमुळे हा महोत्सव महाराष्ट्रातील सर्वसमावेशक नाट्यमहोत्सव ठरला आहे.  


या वेळी विनोद अँड सरयू दोशी फाउंडेशनच्या सरयू दोशी म्हणाल्या, ‘विनोद दोशी नाट्य महोत्सवाचा १०वा वर्धापन दिन साजरा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. फाउंडेशनमध्ये हे सर्व आमच्यासाठी अतिशय जवळचे आहे. गेल्या दशकात आम्ही या महोत्सवाप्रती वाढता उत्साह पाहिला आहे, जो केवळ नाटकांच्या गुणवत्तेमुळेच नव्हे, तर कलाक्षेत्रातल्या तरुणांच्या वाढत्या सहभागामुळेही आहे. अभिव्यक्ती आणि कार्यक्षमतेसाठी हे एक व्यासपीठ आहे ज्यासाठी आम्ही अथक काम केले आहे. खूप प्रेमाने, आम्ही पुण्यातील लोकांसाठी पाच दिवसांचा केवळ नाटकांचा नव्हे तर जीवनाचाच उत्सव आयोजित करत आहोत.’

महोत्सवाचे संचालक अशोक कुलकर्णी म्हणाले, ‘हे अगदी विशेष दशक आहे. खास दशकपूर्तीसाठी यावर्षी नाट्यमहोत्सवात आम्ही दोन अभिजात नाटके पुनरुज्जीवित करत आहोत. ‘ययाति’ १९६०च्या दशकांतले गिरीश कार्नाडांचे हे अभिजात नाटक, प्रथमच पुण्यात उभे राहील. ज्यांनी आम्हाला खूप वर्षांपासून खूप प्रेम दिले त्या आमच्या प्रेक्षकांसाठी ही आमची खास भेट आहे. या उत्सवातला माझा आवडता भाग म्हणजे नाट्यप्रयोगानंतर कलाकार आणि प्रेक्षकांमधील अनौपचारिक संवाद. खुला संवाद चालू ठेवणे ही विनोद दोशी नाट्य महोत्सव करण्यामागची एक भावना आहे.’

महोत्सवाविषयी :
दिवस : १९ ते २३ फेब्रुवारी २०१८
स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link