Next
रंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे मशाल पदयात्रा
मुख कर्करोग आणि हेल्मेट वापराविषयी जनजागृती मोहीम
प्रेस रिलीज
Friday, January 11, 2019 | 03:00 PM
15 0 0
Share this article:



पुणे : असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सिलोफिशियल सर्जन्स ऑफ इंडिया यांच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या रंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे मुख कर्करोग जनजागृती मोहीम आणि हेल्मेट वापराविषयी १० जानेवारी २०१९ रोजी मशाल पदयात्रा काढण्यात आली. आझम कॅंपस, सेव्हन लव्हज चौक, स्वारगेटमार्गे भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज अशी पदयात्रेची मार्गक्रमणा होती.  

कॉलेजचे प्राचार्य रमणदीप दुग्गल, विभागप्रमुख डॉ. जे. बी. गारडे यांनी मशालयात्रेचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांनी हेल्मेटधारक दुचाकी चालकांना गुलाबपुष्पे दिली, तर हेल्मेट नसलेल्या दुचाकीचालकांना अपघाताच्या शस्त्रक्रियांचे फोटो दाखवले. या वेळी ‘ये पान हमे इस मोड पे ले आया’ हे मुख कर्करोगावर जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले.



हेल्मेट न वापरल्यामुळे होणाऱ्या अपघातांत दात तुटणे, जबडा फाटणे, हनुवटी तुटणे याचे प्रमाण अधिक आहे. त्यात दंत चिकित्सकांना शस्त्रक्रिया कराव्या लागतात. त्यांनी केलेल्या शस्त्रक्रियांचे पोस्टर घेऊन १०० डेंटिस्ट आणि विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search