Next
सुपरमाईंड संस्थेची कार्यशाळा
प्रेस रिलीज
Friday, February 09 | 12:13 PM
15 0 0
Share this story

अर्चिता मडके, सुवर्ण कऱ्हाडकर, मंजुषा वैद्य व दया कुलकर्णी

पुणे : ‘नववीतून दहावीत जाताना बदलणाऱ्या अभ्यासक्रमाप्रमाणे विद्यार्थ्यांनी कोणत्या अध्ययन क्षमता आत्मसात केल्या पाहिजेत, याचे भान विद्यार्थी व पालक यांना यावे, यासाठी पुण्यातील ‘सुपरमाईंड’ या संस्थेतर्फे विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती सुपरमाईंड संस्थेच्या मंजुषा वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सुपरमाईंडच्या संचालिका अर्चिता मडके व समुपदेशिका सुवर्णा कऱ्हाडकर, दया कुलकर्णी  उपस्थित होत्या.

मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे ही कार्यशाळा होणार असून, त्याचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. विविध विषयातील तज्ज्ञ या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये डॉ. स्नेहा जोशी, डॉ. उमेश प्रधान, डॉ. गणेश राऊत, सुवर्ण कऱ्हाडकर यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

दहावीच्या वर्षात विद्यार्थी व पालकांनी नेमके काय करायला हवे, याबद्दलचे विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमातून विविध विषयांचे तज्ज्ञ करणार आहेत. यामध्ये विज्ञान, गणित, मराठी, इंग्रजी व इतिहास आदी विषयांचा समावेश आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीची पाठ्यपुस्तके व आराखडा बदलेला आहे. त्या धर्तीवर इयत्ता नववीची वार्षिक परीक्षा देताना, विद्यार्थ्याने कसा अभ्यास करून गुणवत्ता वाढवावी, याबद्दलही या कार्यक्रमात मार्गदर्शन केले जाणार आहे. 

नववीच्या बदललेल्या पॅटर्ननुसार दहावी इयत्तेत जाताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यास पद्धतीत काही विशेष बदल करणे आवश्यक आहे. त्याकरिता काही क्षमता विकसित करण्यासाठी मे महिन्याच्या सुट्टीचा वापर विद्यार्थी कसा करू शकतात, यावरही तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करतील. दहावी इयत्तेमध्ये स्वअध्ययनाला अधिक महत्व आहे. त्यामुळे शास्त्रशुद्ध स्वअध्ययन कसे करावे, याचे मार्गदर्शन सुपरमाईंडचे तज्ज्ञ समुपदेशक करतील. 

या कार्यक्रमास पालकांनीही आवर्जून उपस्थित राहिल्यास दहावीच्या वर्षात विद्यार्थ्याला सकारात्मक पाठींबा कसा द्यावा, हे पालकांना समजेल. तेव्हा विद्यार्थ्यांसह पालकांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या कार्यशाळेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून, सर्वांसाठी ती विनामूल्य आहे.

कार्यशाळेविषयी :
दिनांक : मंगळवार, १३ फेब्रुवारी २०१८
वेळ : सायंकाळी पाच ते आठ
स्थळ : टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link