Next
‘येस बँक-येस ग्लोबल इन्स्टिट्यूट’चा अजेंडा सादर
प्रेस रिलीज
Monday, May 14 | 05:09 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : येस बँक आणि येस ग्लोबल इन्स्टिट्यूट यांनी अजेंडा २५x२५ दाखल केल्याचे जाहीर केले आहे. हा अजेंडा २०२५पर्यंत भारतातील सर्व उद्योजकांमध्ये महिलांचे प्रमाण २५ टक्के करण्याच्या दृष्टीने भारतातील उदयोन्मुख महिला उद्योजकांसाठी अनुकूल स्टार्ट-अप वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ही घोषणा नीती आयोग, अटल इनोव्हेशन मिशन, इन्व्हेस्ट इंडिया व स्टार्टअप इंडिया यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या येस बँक– येस ग्लोबल इन्स्टिट्यूट वार्षिक स्टार्टअप परिषदेत यामध्ये करण्यात आली.

‘उद्योजकतेच्या दृष्टीने महिलांचे सबलीकरण’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या उद्घाटनपर परिषदेमध्ये दोन पॅनलचा समावेश करण्यात आला होता व त्यांनी भारतात महिला उद्योजकांचे प्रमाण वाढवण्यासाठी पोषक स्थितीची आवश्यकता यावर विवेचन केले. या परिषदेत, अजेंडा २५x२५ चा समावेश करणाऱ्या आणि नाविन्य साधणाऱ्या महिलांना सबल करणे, गुंतवणुकीला उत्तेजन देणे, सहयोगांना चालना देणे व आर्थिक संधींमध्ये वाढ करणे यावर भर देणाऱ्या १० स्टेप डेव्हलपमेंट्ल मॉडेल तयार करण्याची गरज अधोरेखित करणाऱ्या ‘पुटिंग विमेन फर्स्ट: बिल्डिंग द स्टार्ट-अप इकोसिस्टीम ग्राउंड अप’ या येस बँक– येस ग्लोबल इन्स्टिट्यूट पाहणी अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

‘इन्व्हेस्ट इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बागला व अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन डायरेक्टर आर. रामनन यांनी येस बँकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘उद्योजकतेच्या दृष्टीने महिलांचे सबलीकरण’ हा अहवाल प्रकाशित केला.

या उपक्रमाविषयी बोलताना, येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि येस ग्लोबल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष राणा कपूर यांनी सांगितले, ‘अंदाजे आठ दशलक्ष महिला उद्योजक विचारात घेऊन, भारताच्या प्रगतीला नवे बळ देण्यासाठी ‘महिलाभिमुख व महिलाकेंद्री’ बदलांना सर्वाधिक महत्त्व देण्यावर भारतीय स्टार्टअप क्षेत्राने लक्ष केंद्रित केले आहे. २०२५पर्यंत, मनुष्यबळामध्ये महिलांना सामावून घेतल्याने भारताच्या जीडीपीला आणखी १६ टक्के चालना मिळणार आहे. देशाची समावेश व समान सामाजिक-आर्थिक प्रगती करण्यासाठी २०२५पर्यंत देशातील उद्योजकांमध्ये महिलांचे प्रमाण किमान २५ टक्के असेल, हे लक्ष्य साध्य करायला हवे.’

इन्व्हेस्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी बागला म्हणाले, ‘भारतात स्त्री-पुरुष समानतेचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, टिअर दोन व तीन शहरांत महिलांचा सहभाग वाढतो आहे. ग्रामीण भागातील महिलांमधील उद्योजकेतेचे गुण व नाविन्य यांना चालना देण्याच्या दृष्टीने, स्टार्टअप यात्रा अशा उपक्रमांनी केवळ चार महिन्यांत १२ गावांचा समावेश केला आहे, ही उल्लेखनीय बाब आहे.’

नीती आयोगाचे अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन डायरेक्टर आर. रामनन म्हणाले, ‘देशातील ४८ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या महिलांची असताना, परिवर्तनाच्या मूलभूत घटकांमध्ये महिलांचा समावेश असणे अत्यावश्यक आहे. नोकरी शोधणाऱ्यांचा देश न ठरता, नोकऱ्या निर्माण करणाऱ्यांचा देश बनण्यासाठी आपण महिला उद्योजकांची जास्तीत जास्त क्षमता विकसित व्हावी म्हणून आपण प्रयत्न करायला हवेत. देश यशस्वी होण्यासाठी देशातील महिला उद्योजकही यशस्वी होतील, याची खबरदारी आपण घ्यायला हवी.’

येस बँकेने आयस्टार्ट राजस्थान व एफआयटीटी, आयआयटी दिल्ली याबरोबरही दोन करार केले असून, त्यानुसार बँक येस हेड स्टार्टअप कार्यक्रमाचा भाग म्हणून, दोन्ही संस्थांशी संबंधित स्टार्टअपना मार्गदर्शन व सल्ला सेवा या स्वरूपात इन-हाउस स्टार्टअप कौशल्यामध्ये विस्तार करणार आहे.

या कार्यक्रमात ‘डीएससीआय’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रमा वेदश्री, रेहवा सोसायटीच्या सह-संस्थापक सॅली होळकर, अॅक्सेंचर व्हेंचर्स अँड ओपन इनोव्हेशनचे व्यवस्थापकीय संचालक अवनिश सभरवाल, ‘आयएएन’च्या अध्यक्ष पद्मजा रूपारेल, राजस्थान सरकारच्या ‘आयस्टार्ट’चे प्रकल्प अधिकारी मनु शुक्ला, एंत्रप्रिन्युअर इंडियाच्या एडिटर-इन-चीफ रितू मार्या, ‘आयएनसी४२’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव अग्रवाल हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.  
 
‘आयस्टार्ट राजस्थान’विषयी :
आयस्टार्ट राजस्थान हा नाविन्याला चालना देणे, रोजगारनिर्मिती करणे व गुंतवणुकीला उत्तेजन देणे ही उद्दिष्टे असलेला राजस्थान सरकारचा मुख्य उपक्रम आहे. राज्यात आर्थिक प्रगती व विकास करण्यासाठी मदत करेल, असे नाविन्य व उद्योजकता जतन करणे, हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. या उपक्रमाद्वारे, माहितीची देवाण-घेवाण व निधीपुरवठा सहजपणे उपलब्ध होईल, असे वातावरण निर्माण करण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे.   राजस्थानमध्ये सक्षम स्टार्टअप व्यवस्था विकसित करण्यासाठी आयस्टार्ट राजस्थानबरोबर भागीदारी करताना येस बँकेला अतिशय आनंद होत आहे.

‘एफआयटीटी’विषयी :
आयआयटी दिल्ली येथे स्थापन झालेल्या फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नालॉजी ट्रान्स्फरचे (एफआयटीटी) उद्दिष्ट या उद्योगासोबत प्रभावीपणे काम करणे हे आहे.  विज्ञान व तंत्रज्ञानाला चालना देणे, प्रसार करणे व शाश्वत व्यावसायीकरण करणे.  आयआयटी दिल्ली येथे स्टार्टअप व्यवस्थेला उत्तेजन देण्याच्या हेतूने एफआयटीटीशी सहयोग करताना येस बँकेला अतिशय अभिमान वाटतो.

‘येस ग्लोबल इन्स्टिट्यूट’विषयी :
येस बँकेतील विचारवंतांचा गट असलेल्या येस ग्लोबल इन्स्टिट्यूटची स्थापना उदयोन्मुख क्षेत्रांतील संशोधन व अर्थसहाय्य याद्वारे भारतातील शाश्वत आणि समावेशक सामाजिक-आर्थिक प्रगती व विकास साधण्यावर भर देण्यासाठी करण्यात आली आहे. भारतातील नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेले येस ग्लोबल इन्स्टिट्यूट भारताच्या सामाजिक-आर्थिक विकासावर परिणाम करणाऱ्या करआकारणी, शिक्षण, आरोग्यसेवा, आर्थिक सुरक्षितता, ऊर्जा व नैसर्गिक संसाधने अशा विविध क्षेत्रांवर संशोधन करते. याच दिशेने, येस ग्लोबल इन्स्टिट्यूट सांस्कृतिक उद्योग, नाविन्याची ठिकाणे, डिजिटायझेशनचा परिणाम, तसेच संवाद साधणे, ज्ञानाची निर्मिती, कौशल्य विकास व संबंधित घटकांचा सहभाग याद्वारे सर्वांगीण विकासासाठी नैसर्गिक भांडवल व खासगी भांडवलाला चालना देणे अशा संकल्पनांचा अवलंब करते.  

‘येस बँके’विषयी :
येस बँक ही भारतातील चौथ्या क्रमांकाची मोठी खासगी बँक असून, ती भारतातील २९ राज्ये व सात केंद्रशासित प्रदेशांत कार्यरत आहे व बँकेचे मुख्यालय मुंबईतील लोअर परेल इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट (एलपीआयडी) येथे आहे. बँक म्हणजे, संस्थापक राणा कपूर आणि त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापन गटाच्या, अत्यंत दर्जेदार, ग्राहक केंद्रित, सेवांवर आधारित, भारताच्या भविष्यातील व्यवसायांना सेवा देणारी खासगी बँक स्थापन करण्याच्या व्यावसायिक व उद्योजकताविषयक बांधिलकी, दूरदृष्टी व धोरणाचे फलित आहे.

येस बँकेने आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती, सेवेबाबत गुणवत्तेची आणि कार्यात्मक उत्कृष्टतेची उच्च प्रमाणके अवलंबली आहेत आणि बँकेतर्फे सर्व ग्राहकांना समावेशक बँकिंग सेवा व वित्तीय सुविधा दिल्या जातात. येस बँकेचा बँकिंगप्रती आणि रिटेल, कॉर्पोरेट व उदयोन्मुख कॉर्पोरेट बँकिंग ग्राहकांप्रती दृष्टिकोन ज्ञानावर आधारित आहे. भारतातील प्रोफेशनलची बँक म्हणून येस बँक सातत्याने आपल्या वैशिष्ट्यांमध्ये बदल घडवून आणत असून बँकेचे व्हिजन २०२० पर्यंत भारतातील सर्वोत्कृष्ट दर्जेदार बँक बनणे असे आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link