Next
शंकर नारायण बर्वे
BOI
Wednesday, April 25 | 03:45 AM
15 0 0
Share this story

प्रख्यात सूचीकार शंकर नारायण बर्वे यांचा २५ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय.....
......
२५ एप्रिल १९१० रोजी जन्मलेले शंकर नारायण बर्वे हे सूचीकार आणि अभ्यासक म्हणून ओळखले जातात.

इतिहासाच्या अभ्यासाचं साधन म्हणून नियतकालिकांना फार महत्त्व असतं. एखाद्या कालखंडातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक अशा कोणत्याही विचारप्रवाहांचा ठाव घेण्यासाठी, संशोधकांना त्या काळातील नियतकालिकांचाच आश्रय घ्यावा लागतो. आपल्या विषयाशी संबंधित असलेलं वाङ्‌मय शोधण्यात संशोधकांच्या वेळेचा आणि कार्यशक्तीचा अपव्यय होऊ नये, यासाठी जुन्या आणि विद्यमान नियतकालिकांची आणि त्यातल्या लेखांची सूची उपलब्ध असणं आवश्यक आणि सोयीचं ठरतं. बर्वे यांनी मराठी नियतकालिकांची अशी तीन खंडी सूची अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केली होती. 

‘साहित्य सहकार’ नावाच्या मासिकाचं संपादनही ते करत असत. 

२३ डिसेंबर १९९६ रोजी त्याचं निधन झालं. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link