Next
‘समाजाच्या प्रगतीत वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा’
डॉ. अरविंद नातू यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Thursday, January 17, 2019 | 05:23 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘विज्ञान-तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीमुळे देश प्रगतीपथावर आहे; मात्र समाज अजूनही अनेक रूढी-परंपरांमध्ये गुरफटलेला दिसतो. समाजाच्या प्रगतीसाठी लहानपणापासूनच वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तरुणांनी प्रत्येक गोष्टीमागील शास्त्र समजून घेऊन जागरूकपणे विचार करण्याची वृत्ती अंगीकारावी,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांनी व्यक्त केले.

जाणीव युवा फाउंडेशनतर्फे तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी वंचित विकास संस्थेच्या वडगाव शिंदे (लोहगाव) येथे नुकतेच तीन दिवसीय निवासी ‘मानव निर्माण शिबिर’ आयोजित केले होते. त्यावेळी ‘तरुणांमध्ये वैज्ञानिक जागरुकता’ या विषयावर डॉ. नातू बोलत होते. या शिबिरात संपूर्ण महाराष्ट्रातून ४५ युवक-युवतींनी भाग घेतला. सामाजिक चेतना आणि युवकांच्या सशक्तीकरणाच्या दृष्टीने हे निवासी शिबिर महत्त्वाचे ठरले.

या शिबिरात वाहतूक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते, प्रशासकीय इंडोर्फीनचे प्रमुख आशिष खांडेकर यांनी ‘जीवनात योग्य निर्णय घेताना’, ‘अपेक्स’चे सतीश खाडे यांनी ‘व्यवसायाच्या विकासातील भूमिका’, वारकरी सेवा संघाचे राजाभाऊ चोपदार यांनी ‘पालखी-वारीमधील व्यवस्थापन’, जेष्ठ पत्रकार सुनील माळी यांनी ‘पत्रकारिता व त्यातील संधी’, वंचित विकास संस्थेच्या संचालिका मीना कुर्लेकर यांनी ‘अवयव दान व सामाजिक जबाबदारी’, अनघा पाठक यांनी ‘उत्तम स्व-व्यवस्थापन- कौशल्य विकासासाठी स्पर्धात्मक ग्लोबल करियर’, डॉ. श्रीकांत गबाले यांनी ‘स्वआकलन व जागरुकता’, सनदी लेखापाल अनुप तांबे यांनी ‘आर्थिक नियोजन’ या विषयांवर मार्गदर्शन केले.सहभागी युवकांनी समकालीन भारतातील जातीयता, मिटू चळवळ, सरकारी संस्थांची स्वायत्तता, सोशल मीडिया आणि सायबर सुरक्षा, ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या आदी विषयांवर सांघिक सादरीकरणातून विचारमंथन केले.

या प्रसंगी अनघा पाठक म्हणाल्या, ‘आपण आपल्यातील कौशल्यांचे मूल्यांकन, नेतृत्वाची आणि व्यवस्थापनाचे परीक्षण करून त्यानुसार सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच यश संपादन करू शकतो. त्यासाठी स्वतःची प्रगती ही तथ्य समोर ठेऊन करावे आणि आपल्या गुण दुर्गुणांची आखणी करून योग्य तो निर्णय घ्यावा.’

डॉ. गबाले म्हणाले, ‘जाणीव युवा फाउंडेशनतर्फे व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रांत विविध उपक्रम राबवले जातात. गेली आठ वर्षे मानव निर्माण शिबिर होत आहे. स्वतःमधील योग्य गुण ओळखून सद्यस्थितीत चालू असलेल्या विविध गोष्टींशी जुळवून घेणे आणि अभ्यासात्मकपणे त्याकडे पाहण्याचे सामाजिक भान या शिबिरामुळे जागृत होते.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link