Next
पोळा सणाला पळसाची झाडे न तोडण्याचे आवाहन
नागेश शिंदे
Wednesday, August 28, 2019 | 05:30 PM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर :
ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या सर्जा-राजाची पूजा करून बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी घरासमोर पळसाच्या झाडाची मेढी लावण्याचे विशेष महत्त्व आहे; मात्र प्रत्येक घरासमोर अशी मेढी लावल्यामुळे पळसाच्या झाडांची संख्या कमी होते. त्यामुळे पळसाची झाडे न तोडता बैलपोळा साजरा करावा, असा संदेश चिंचगव्हाण येथील कै. कोंडाबाई व्यवहारे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील भारत स्काउट-गाइड पथकाने दिला आहे.

शेतकऱ्यांच्या कामाचे ओझे वर्षभर वाहणाऱ्या सर्जा-राजाचा महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. या सणाच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांच्या खांद्यावर जू ठेवत नाहीत. या सणाच्या दिवशी सर्व शेतकरी आपापल्या घरासमोर पळसाचे झाड तोडून मेढी लावतात. त्यामुळे पळसवृक्षांची संख्या घटत आहे. ‘पळसाचे वृक्ष न तोडता पोळा सण साजरा करावा आणि वृक्ष वाचवावेत. हे वृक्ष वाचले तर आपले शेती-शिवारदेखील बहरेल,’ असा संदेश चिंचगव्हाण येथील कै. कोंडाबाई व्यवहारे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या रॅलीतून देण्यात आला. या उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष होते.

या संदेशाचे प्रत्येक विद्यार्थ्याने आणि पालकांनी पालन करावे, असे आवाहनदेखील या वेळी करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक श्री. पवार, सूर्यवंशी, साखरे, दामोदर डवरे, तेलंगे, लोमटे, हानवते, दुगाळे आदी शिक्षकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.



(पोळा या विषयावरची बहिणाबाई चौधरी यांची अहिराणी बोलीतील कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search