Next
सॅमसंगच्या विंड फ्री एअर कंडिशनरचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Tuesday, February 27 | 11:15 AM
15 0 0
Share this story


मुंबई : ‘सॅमसंग इंडिया’ या देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वात विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने २२ फेब्रुवारी रोजी जगातील पहिल्या विंड फ्री™ एअर कंडिशनरचे उद्घाटन केले. या नव्या एअर कंडिशनरमध्ये सॅमसंगच्या एक्सक्लुझिव विंड फ्री™ कुलिंग तंत्रज्ञानाचा रचनांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. हा एअर कंडिशनर ग्राहकांना घरातील वातावरण थंड करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा सक्षमता देण्यासाठी मदत करेल. यामुळे थेट थंड वाऱ्याचा झोत अंगावर येणे टाळता येणार आहे. हे एअर कंडिशनर्स खास भारतातील तीव्र हवामानाच्या परिस्थितीला अनुसरून साकारण्यात आले आहेत.

या नव्या पद्धतीत, विंड फ्री™ कुलिंगचे तंत्रज्ञान वापरून, खोली आरामदायी व थंड ठेवता येते. तसेच २१ हजार सूक्ष्म एअर होल्समुळे थंड हवा पसरवली जाते. दोन टप्प्यातील ही कुलिंग सिस्टम प्रथमतः कमी तापमान आवडणाऱ्यांसाठी फास्ट कुलिंग मोड घेऊन येते; यानंतर आपोआप विंड फ्री™ कुलिंग मोडवर स्विच केले जाते आणि एकदा का हवे असलेले तापमान मिळाले, की स्टील एअरची निर्मिती होते. यामुळे फास्ट कुलिंग मोडमध्ये तब्बल ७२ टक्क्यांची ऊर्जा बचत केली जाते. या अनोख्या ट्रिंगल आर्किटेक्चरमुळे सर्वोत्तम कुलिंगची कामगिरी पार पाडली जाते. सुधारित विस्तारीत इनलेटची रचना अधिक चांगल्या हवेसाठी विस्तारते. सकारात्मकता आणि आउटलेटचा अँगल, एक्स्ट्रा व्ही-ब्लेड्स आणि मोठे फॅन यामुळे हवा थंड राहील आणि अधिक जलद गतीने वाहेल, तसेच विस्तारीत स्वरूपात प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोचेल याची खात्री दिली जाते. विंड फ्री एसीची श्रेणी सर्व प्रमुख रिटेल आउटलेटमध्ये ५०,९५० ते ७४,२६० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

‘एअर कंडिशनरमुळे थेट थंड हवा अंगावर येते आणि त्याची येणारी इलेक्ट्रिसिटी बिले तर गगनाला भिडणारी असतात, आजच्या घडीला ग्राहकांपुढे हे दोन प्रश्न आहेत. यामुळेच सॅमसंगने हे प्रश्न एकत्रित करून, पहिला विंड फ्री™ एअर कंडिशनर सादर केला आहे, याद्वारे कुलिंग आरामदायी होते, ऊर्जा सक्षमताही वाढते. ग्राहक प्रधान नावीन्यपूर्णतेमुळे आमच्या ब्रँडची वचने आम्ही पूर्ण करू शकतो आणि ही उत्पादने याच दृष्टीकोनावर आधारित आहेत. या नव्या तंत्रज्ञानामुळे, खास करून भारतीय ग्राहकांच्या विशेष गरजांची पूर्ती केली जाते आणि त्यांना प्राधान्यक्रम दिला जातो,’ असे सॅमसंग इंडियाचे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स बिझनेस उपाध्यक्ष आलोक पाठक म्हणाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link