Next
‘गोठ’ मालिकेचे ५०० भाग पूर्ण
प्रेस रिलीज
Thursday, June 21 | 05:07 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘स्टार प्रवाह’च्या ‘गोठ’ या लोकप्रिय मालिकेने ५०० भागांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ५०० भाग पूर्ण केल्यानिमित्त मालिकेच्या सेटवर केक कापून जोरदार सेलिब्रेशनही करण्यात आले.

‘गोठ’ मालिका सोमवार ते शनिवार या कालावधीत रात्री ९.३० वाजत प्रसारित केली जाते. या मालिकेवर प्रेक्षकांनी आजवर भरभरून प्रेम केले आहे. बयोआजी, अभय म्हापसेकर या खलनायकी व्यक्तिरेखांबरोबरच विलास आणि राधाची जोडी लोकप्रिय ठरली. प्रेक्षकांनी सोशल मीडियाद्वारे या जोडीचे ‘विरा’ असे नामकरणही केले. इतकेच नाही, तर विलास आणि राधाची जोडी सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक ठरली.

गेल्या दोन वर्षांत मराठी टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ चाललेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या मालिकांपैकी ‘गोठ’ ही एक मालिका आहे. त्यामुळे या मालिकेचे ५०० भाग पूर्ण होणे हा निश्चितच महत्त्वाचा टप्पा आहे. हा टप्पा गाठल्याबद्दल सेटवर उत्साहाचे वातावरण होते. सगळ्यांनी एकत्र येऊन केक कापत हा आनंद साजरा केला.

‘मालिकेचे कथानक आतापर्यंत उत्तम पद्धतीने सादर करण्यात आल्याने प्रेक्षक त्यात गुंतून राहिले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. या जोरावरच आतापर्यंतची वाटचाल झाली आहे. पुढेही आम्ही प्रेक्षकांना नक्कीच आनंद देत राहू, मालिकेचे कथानक अधिक रंजक करण्याचा प्रयत्न करणार आहोत,’ अशी भावना विलास आणि राधा अर्थात समीर परांजपे आणि रूपल नंद यांनी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link