Next
‘घरातील हवा प्रदूषणासाठी सावलीत वाढणारी वनस्पती लावावी’
डॉ. घाटे; विज्ञान परिषद आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सतर्फे व्याख्यान
प्रेस रिलीज
Thursday, July 18, 2019 | 02:53 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘हवेच्या प्रदूषणाचा सामना जसा घराबाहेर करावा लागतो, तसाच घराच्या आतही करावा लागतो. दारे-खिडक्या बंद असलेल्या घरांमध्ये शरीरासाठी घातक रासायनिक प्रदूषके असतात. त्यावर उपाय म्हणून घरांमध्ये हवेतील विषारी द्रव्ये शोषणाऱ्या आणि कमी पाण्यात व उजेडात वाढणाऱ्या वनस्पतीची लागवड करावी,’ असे मत वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. सीमा घाटे यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद आणि दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘घरातील हवा प्रदूषण : मिथक आणि सत्य’ या विषयावर डॉ. घाटे यांचे व्याख्यान झाले. घरात होणारे हवा प्रदूषण, त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम, ते टाळण्यासाठी घ्यायची काळजी अशा मुद्द्यांवर त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष विनय र. र., उपाध्यक्ष प्रा. राजेंद्रकुमार सराफ आदी उपस्थित होते.

डॉ. घाटे म्हणाल्या, ‘घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू शरीरासाठी घातक रसायने बाहेर टाकतात. त्यामध्ये मच्छर अगरबत्या, विविध प्रकारचे सेंट किंवा परफ्युम, डांबर गोळ्या, उग्र वासाच्या उदबत्त्या, धूम्रपान, स्वयंपाक घरातील धूर आदींचा समावेश होतो. घरांमधील दारे-खिडक्या बंद असल्याने हवा खेळती राहत नाही. त्यामुळे ही प्रदूषके आतल्या आत कोंडली जातात. त्याचा मनुष्याच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे डोकेदुखी, थकवा, कान किंवा घशाला होणारा संसंर्ग, तसेच त्वचेचे विकार होतात.’


‘घरातील या हवा प्रदूषणाला दूर ठेवण्यासाठी सावलीत वाढणारी वनस्पती गच्चीत लावायला हवीत. या वनस्पतींना कमी पाणी आणि कमी प्रकाश लागतो. छोट्या भांड्यामध्येही त्या वाढू शकतात. या वनस्पती प्रदूषके शोषत असल्याने घरांमधील हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होते,’ असेही त्यांनी नमूद केले. 

प्रा. राजेंद्रकुमार सराफ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विनय र. र. यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करीत आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search