Next
भिवंडीत पारंपरिक आदिवासी दिवाळी महोत्सव
मिलिंद जाधव
Monday, November 05, 2018 | 10:57 AM
15 0 0
Share this article:

भिवंडी : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आदिवासी विकास क्षेत्रात काम करणाऱ्या येथील विजेता विचार फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुपचा सहेली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडीतील काटई येथील डोंगरपाडा दिवानमाल या आदिवासी पाड्यावर पाच नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत पारंपरिक आदिवासी दिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू असून, शहर व ग्रामीण भागात दिवाळीच्या खरेदीसाठी एकच लगबग दिसत आहे. अनेक सामाजिक संस्था व राजकीय पक्षांकडून खास दिवाळी पहाट कार्यक्रमही ठिकठिकाणी आयोजित केले आहेत. विजेता विचार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व डोंगरपाडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक शामकांत नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

या पारंपरिक आदिवासी दिवाळी महोत्सव कार्यक्रमाप्रसंगी डोंगरपाडा येथील परिसरातील जवळपास पाच ते सहा पाड्यातील सुमारे ३५०हून अधिक आदिवासी नागरिकांना एकत्र करत त्यांना दिवाळीनिमित्त कपडे, फराळ व मिठाई वाटप करण्यात येणार आहे; तसेच आदिवासींचे पारंपरिक तराफा नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या वेळी भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले, पंचायत समिती सदस्य गजानन असवारे, आदिवासी समाज मंडळ अध्यक्ष राम मोरगा यांच्यासह विजेता विचार फाउंडेशन जायंट्स ग्रुपच्या सहेली ग्रुपचे सहकारी व आदिवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक व विजेता विचार फाउंडेशनचे नवाळे यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 50 Days ago
Excellent activity . Hope , others will join . Hope, they do this every year . Best wishes .
0
0

Select Language
Share Link
 
Search