Next
रहें ना रहें हम
BOI
Monday, September 17, 2018 | 10:11 AM
15 0 0
Share this story

संगीताशिवाय चित्रपट ही कल्पना मनाला पटत नाही. गाणी आणि भावना यांचा जवळचा संबंध असतो, हे लक्षात घेऊन हिंदी चित्रपट संगीतात पीएचडी केलेल्या मृदुला दाढे-जोशी यांनी चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ बहाल करणाऱ्या संगीतकारांची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या अजरामर गाण्यांतील सौंदर्यस्थळे ‘रहें ना रहें हम’मधून दाखविली आहेत.

मस्ती, उत्साह, धमाल व त्याचबरोबर दु:ख, विरहाची भावना ताकदीने पेश करणारे रामचंद्र नरहर चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र या मराठमोळ्या संगीतशैलीची ओळख यातून करून दिली आहे. शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, तसेच देशोदेशींचे संगीत अशा अनेक प्रवाहातून निर्माण होणारे सलील चौधरी यांचे निर्मल संगीत, संगीतकारांना ग्लॅमर, स्टारडम मिळवून देणारी शंकर-जयकिशन ही जोडगोळी, गाण्यांच्या स्वरातून उत्कटता व्यक्त करणारे मदनमोहन यांचे संगीत याबद्दल यात सखोल माहिती दिली आहे.

त्याचप्रमाणे रोशन, सचिन देव बर्मन, वसंत देसाई, ओ. पी. नय्यर, हेमंतकुमार, जयदेव, खय्याम, लक्ष्मीकांत-प्यारेलाल आदी ज्येष्ठ श्रेष्ठ संगीतकारांची ओळख व त्यांच्या अजरामर गीतांचे मर्म लेखिकेने उलगडले आहे.

प्रकाशक : रोहन प्रकाशन
पाने : २५३
किंमत : ३०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link