Next
औंध येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
प्रेस रिलीज
Monday, April 15, 2019 | 04:11 PM
15 0 0
Share this article:



औंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मानव विद्याशाखेचे अधिष्ठाता,  इंटरनॅशनल सेंटरचे डायरेक्टर, डिफेन्स विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांसंदर्भात मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिल्यामुळे संपूर्ण भारतीय समाज एकसंघ होऊन विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. संपूर्ण भारत देश सशक्त होण्यासाठी सर्व युवकांनी भारतीय समाज सुधारकांच्या साहित्याचे सखोल वाचन करणे गरजेचे आहे. आपला भारत देश तरुणांच्या जीवावरच महासत्ता होणार आहे. त्यामुळे सर्व तरुणांनी समाजसुधारकांचे विचार आत्मसात करायला पाहिजेत.’

‘चांगला नागरिक होण्यासाठी चांगल्या मार्कापेक्षा चांगले चरित्र असणे आवश्यक आहे. डॉ. आंबेडकरांनी कोणतेही शस्त्र हातात न घेता, समाज परिवर्तनाचे कार्य केले. अशाच स्वरूपाचे कार्य आजच्या तरुणांनी करावे,’ असे आवाहन डॉ. खरे यांनी केले.



कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘संवेदनशील माणूसच समाज परिवर्तन करू शकतो. डॉ. आंबेडकर हे संवेदनशील होते त्यामुळेच त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात समाज परिवर्तन केले. डॉ. आंबेडकरांसारखा माणूस युगायुगातून एकदाच जन्माला येतो. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व तरुणांनी डॉ. आंबेडकरांचे विचार आत्मसात करून समाज परिवर्तन करण्याचे कार्य करावे.’

यानिमित्त महाविद्यालयात ‘एक मत-एक मूल्य’ या विषयीची शपथ घेण्यात आली. महाविद्यालयातील वाचनकक्षात ग्रंथालयातील महापुरुषांची चरित्रे वाचनासाठी ठेवली असून, सलग पंधरा तास वाचन करण्यासाठी वाचनकक्ष खुला करून देण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, डॉ. संजय नगरकर, प्रा. भीमराव पाटील यांच्यासह इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख डॉ. सुहास निंबाळकर यांनी करून दिली. सूत्रसंचालन आयक्यूएसी कमिटीच्या चेअरमन डॉ. सविता पाटील यांनी केले. आभार डॉ. सुप्रिया पवार यांनी मानले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search