Next
‘सिटी-एनसीपीए’तर्फे संगीत महोत्सवाचे आठवे पर्व
प्रेस रिलीज
Tuesday, November 13, 2018 | 04:51 PM
15 0 0
Share this article:

पुणे : नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) आणि सिटी इंडिया यांच्या वतीने ‘सिटी-एनसीपीए आदी अनंत- इथून ते अनंतापर्यंत’ या भारतीय संगीत महोत्सवाच्या आठव्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. विविध शहरांमध्ये रंगणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात १८ नोव्हेंबर २०१८ रोजी पुण्यातून होईल.

ख्यातनाम बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि त्यांचे ज्येष्ठ शिष्य रूपक कुलकर्णी यांच्या सुरांनी हा प्रवास कार्यक्रम १८ नोव्हेंबरला रोजी अण्णाभाऊ साठे ऑडिटोरिअम येथे सायंकाळी ६.३० वाजता सुरू होईल. या मैफिलीत हरिप्रसाद चौरसिया आणि रूपक कुलकर्णी स्वतंत्रपणे आणि एकत्र शास्त्रीय आणि निमशास्त्रीय सुरावटी सादर करतील. भवानी शंकर त्यांना पखवाजावर आणि विजय घाटे व आदित्य कल्याणपूर तबल्यावर साथ देतील.

हरिप्रसाद चौरसियाया वर्षी पुण्यात कार्यक्रम केल्यानंतर ‘आदी अनंत’ मुंबई, चेन्नई आणि बेंगळूरू या तीन शहरांत जाणार आहे. तीन महिने चालणारा हा महोत्सव वर्षभरातील एक बहुप्रतिक्षित महोत्सव आहे. देशातील काही प्राचीन संगीत प्रकारांच्या माध्यमांतून भारतीय संस्कृतीचा शोध घेण्याची संधी यानिमित्ताने प्रेक्षकांना मिळणार आहे. संगीत महोत्सवाच्या आठव्या पर्वात त झाकीर हुसेन, हरिप्रसाद चौरसिया, अमजद अली खान आणि सुधा रघुनाथन अशा शास्त्रीय संगीत विश्वातील काही आदरणीय व्यक्तींचा समावेश असणार आहे.

एक डिसेंबरला मुंबईतील टाटा थिएटर येथे सायंकाळी ६.३० वाजता झाकीर हुसेन (तबला), शिखर नाद कुरेशी (djembe) आणि सबीर खान (सारंगी) यांच्यासह उस्ताद अल्लारखा इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिकच्या विद्यार्थ्यांचा वादनाचा कार्यक्रम होईल. दोन डिसेंबरला टाटा थिएटरमध्येच सायंकाळी ६.३० वाजता अमजद अली खान (सरोद) यांच्यासह अमान अली बंगश आणि अयान अली बंगश (सरोद) यांचे सादरीकरण होईल. त्यांना सत्यजित तळवळकर (तबला) आणि आदित्य कल्याणपूर (तबला) साथसंगत करतील. १२ जानेवारी २०१९ रोजी चेन्नईतील मद्रास म्युझिक अकॅडमी येथे सायंकाळी ६.३० वाजता झाकीर हुसेन (तबला), शिखर नाद कुरेशी (djembe) आणि सबीर खान (सारंगी) यांच्यासह उस्ताद अल्लारखा इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिकच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होईल. २० जानेवारी २०१९ रोजी बेंगळूरू येथील चौदिया मेमोरिअल हॉलमध्ये सायंकाळी ६.३० वाजता सुधा रंगनाथन आणि व्ही. दीपिका यांचा गायनाचा कार्यक्रम होईल. त्यांना एम्बर कानन (व्हायोलिन), पत्री सतिश कुमार (मृदंगम) आणि आर रमण (मोरसिंग) हे साथसांगत करतील.

रूपक कुलकर्णीयाबाबत बोलताना ‘एनसीपीए’चे अध्यक्ष खुशरू एन संतूक म्हणाले, ‘परफॉर्मिंग आर्ट्स जतन करणे, प्रोत्साहन देणे आणि तिचा प्रसार करणे या कामाला वाहून घेतलेले एक राष्ट्रीय केंद्र म्हणून विविध उपक्रमांच्या माध्यमातून ही पुराणकाळातील संस्थात्मक रचना जपण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आमचे भागीदार ‘सिटी’ने महान भारतीय वारसा जपण्यात वर्षानूवर्षे दिलेल्या सहयोगाबद्दल आम्ही आभारी आहोत. खरे तर सिटी एनसीपीए म्युझिक फॉर स्कूलच्या माध्यमातून आम्ही लहान मुलांचा संगीत शिक्षणाचा अधिकार अबाधित ठेवू शकलो आणि युनेस्कोने स्थापलेल्या इंटरनॅशनल कौन्सिल फॉर म्युझिकची  (आयएमसी) सदस्य संस्था म्हणून आमचे कर्तव्य बजावू शकतो, याबद्दल आम्ही समाधानी आहोत.’

झाकीर हुसैनसिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमित झवेरी म्हणाले, ‘आदीअनंत महोत्सवाचे आठवे पर्व सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. देशभरातील प्राचीन गुरू-शिष्य परंपरेला प्रोत्साहन देणे आणि चालना देणे हा या महोत्सवाचा हेतू आहे. आम्हाला आशा आहे की तुमच्यापैकी अनेकजण या संधीचा लाभ घेत संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी प्राचीन सुरावटींना दिलेल्या नव्या रूपाचा आस्वाद घेतील. ‘सिटी’साठी हा उपक्रम अत्यंत अर्थपूर्ण असा आहे. कारण ‘एनसीपीए’सोबत असलेल्या आमच्या अत्यंत सखोल आणि दिर्घकालीन संबंधांचा तो एक भाग आहे. उद्योन्मुख कलाकारांना प्रशिक्षण देण्यापासून ते देशातील काही उत्तम प्रतिभावंतांना जोपासणे या कार्यात भारतीय सांस्कृतिक वारशाची सातत्यपूर्ण प्रगती आणि उत्क्रांतीमध्ये सहभागी होताना ‘सिटी’ला अभिमान वाटतो.’

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
रविवार, १८ नोव्हेंबर २०१८
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : अण्णाभाऊ साठे ऑडिटोरिअम, पुणे.

दिवस : एक डिसेंबर २०१८
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : टाटा थिएटर, मुंबई.

दिवस : दोन डिसेंबर २०१८
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : टाटा थिएटर, मुंबई.

दिवस : १२ जानेवारी २०१९
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : मद्रास म्युझिक अकॅडमी, चेन्नई.

दिवस : २० जानेवारी २०१९
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : चौदिया मेमोरिअल हॉल, बेंगळुरू.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search