Next
ऋग्वेदाचे सामाजिक अंतरंग
BOI
Monday, November 12, 2018 | 04:26 PM
15 0 0
Share this article:

भारतातील अनेकविध जाती, धर्म यांना एकत्र बांधून भाषा, वंश, धर्म, लिंगविरहित समान अधिकार भारतीय राज्यघटनेने नागरिकांना बहाल केले आहे. प्राचीन काळातील वेदाज्ञेची जागा राज्यघटनेने घेतली आहे. सर्व वेदांचे मूळ असणारा ऋग्वेद व त्यातील ज्ञान वाचकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न अॅड. शंकर निकम यांनी ‘ऋग्वेदाचे सामाजिक अंतरंग’मधून केला आहे.

प्रत्येक भारतीयाला निरपेक्ष पद्धतीने राजकीय स्वातंत्र्याप्रमाणेच सामाजिक व धार्मिक स्वातंत्र्य उपभोगता यावे यासाठी ऋग्वेदाचा मागोवा घेतल्याचे लेखक सांगतात. यात सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद या वेदांची रचना या सर्वांचा उगमकर्ता असलेल्या ऋग्वेदाची निर्मिती, एकूण दहा विभागात विभागलेल्या या महाग्रंथात ३९१ ते ४०३ ऋषींच्या रचना, रचनाकार १५५ ऋषींची थोडक्यात माहिती, ऋग्वेदातील ऋचा, सुक्तांमधील महत्त्वाचे विचार, त्यातील देवताविश्व, आताच्या परिस्थितीत उपयुक्त ठरणारी ऋग्वेदातील मार्गदर्शक बांधणी, वेदाभ्यासासाठी पूरक सहा शास्त्रे, ऋग्वेदातील ‘असूर’ या शब्दाची उकल, त्याचा अर्थ यातून उलगडला आहे. ऋग्वेद व अवेस्ता ग्रंथातील साम्यस्थळेही दाखवून दिली आहेत.  
      
प्रकाशन : ओमकार प्रकाशन
पृष्ठे : ३१७
मूल्य : ३३० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search