Next
गर्भवती महिलांसाठी ‘प्रेगोदीवा’चे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, May 10 | 05:07 PM
15 0 0
Share this story

पुणे : गर्भवतींच्या कौतुक सोहळ्याला आधुनिक स्वरूप देत ओएनपी रुग्णालयाने ‘प्रेगोदीवा’ या खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात गर्भवती महिलांना चक्क ‘रँप वॉक’ करण्याची संधी मिळणार आहे. बाळंतपण सुरळीत व्हायच्या दृष्टीने गर्भारपणात केल्या जाणाऱ्या ‘बेली डान्स’ला सध्या प्रचंड लोकप्रियता प्राप्त झाली असून,या कार्यक्रमात गर्भवतींना तज्ज्ञांकडून या नृत्याचे धडेही घेता येणार आहेत.

ओएनपी रुग्णालयाच्या संचालिका डॉ. अमिता फडणीस यांनी ही माहिती दिली. मातृदिनाच्या निमित्ताने १३ मे २०१८ रोजी (रविवार) दुपारी चार वाजता ‘प्रेगोदीवा’चे आयोजन करण्यात आले आहे. पिंपळे-सौदागरमधील विश्वशांती कॉलनी येथे नेक्सा शोरूमजवळ असलेल्या ओएनपी लीला रुग्णालयात हा कार्यक्रम होणार असून, त्यासाठी नोंदणीद्वारे मोफत प्रवेश आहे.

‘रँप वॉक’ आणि ‘बेली डान्स’चा अनुभव घेण्याबरोबरच महिलांना या वेळी गर्भारपणात सौंदर्य खुलवण्यासाठीच्या टिप्सदेखील मिळणार आहेत. त्यांना जोडीदारासह बाळाच्या जन्माशी संबंधित काही मजेदार खेळ खेळता येणार आहेत; तसेच जोडप्यांना खास फोटोशूट देखील करता येणार आहे.

‘प्रेगोदीवा’विषयी :
दिवस :
रविवार, १३ मे २०१८
वेळ : दुपारी चार वाजता
स्थळ : ओएनपी लीला रुग्णालय, नेक्सा शोरूमजवळ, विश्वशांती कॉलनी, पिंपळे-सौदागर, पुणे.
सहभागी होण्यासाठी संपर्क : ७७७६८ ४९६४४/७७७६० ७९९९६
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link