Next
दी एक्झिकॉन ग्रुप व कोकण भूमी प्रतिष्ठानचा करार
ग्लोबल कोकण फेस्टिव्हल २०१८
प्रेस रिलीज
Wednesday, August 22, 2018 | 11:11 AM
15 0 0
Share this storyपुणे :
दी एक्झिकॉन ग्रुप व ग्लोबल कोकण यांच्यामध्ये नुकताच समन्वय करार झाला. या कराराअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यातीलच पहिला कार्यक्रम म्हणजे ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल २०१८.’ या दोन कंपन्यांमधील समन्वय करार २०११पासून आहे. या कराराअंतर्गत दी एक्झिकॉन ग्रुप, ‘ग्लोबल कोकण’तर्फे कोकणाच्या पर्यटनाला व व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
कोकण भूमी प्रतिष्ठान अंतर्गत ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल २०१८’ हा कार्यक्रम कोकणातील संस्कृती, निसर्ग, कला, खाद्य, पर्यटन यांना जागतिक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. एक ते चार नोव्हेंबर २०१८ या कालावधीत तो पुण्यात होणार आहे. कोकणातील पर्यटन व्यावसायिकांचे कोकण ट्रॅव्हल मार्ट, मान्यवर उद्योजकांचे उद्योगभूषण दालन, फूड फेस्टिव्हल, कोकणातील गुंतवणुकीच्या संधी अशी विविध दालने या महोत्सवात उभारण्यात येणार आहेत. या महोत्सवात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित राहणार असून, या क्षेत्रांचे व्यावसायिक मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात येईल. यातून कोकणात प्रकल्प उभे राहावेत, असा प्रयत्न आहे.

कोकण हा महाराष्ट्रातील निसर्गसमृद्ध प्रदेशांपैकी एक आहे. कोकणातील पर्यटन, खाद्य, मासेमारी व शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी प्राप्त होऊ शकतात. यासाठी हे सारे प्रदर्शनामार्फत जगासमोर येणे गरजेचे आहे. तरच जगभरातील गुंतवणूक कोकणात होईल, हा ग्लोबल कोकण फेस्टिव्हलचा मुख्य उद्देश आहे.एक्झिकॉन ग्रुप १९९७पासून प्रदर्शन व इव्हेंट प्रमोशन या क्षेत्रात अग्रगण्य आहे. ही भारतातील एकमेव अशी संस्था आहे, की जी सगळ्या प्रकारच्या व्यावसायिक प्रदर्शनांसाठी व इव्हेंटसाठी कार्यरत आहे.

दी एक्झिकॉन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक एम. क्यू. सय्यद म्हणाले, ‘कोकणातील पर्यटन, खाद्य, संस्कृतीचा प्रसार आम्ही कोकणभूमी प्रतिष्ठानसोबत एकत्र येऊन करणार आहोत आणि कोकणाला एक जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देऊ.’

‘ग्लोबल कोकण’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादवराव म्हणाले, ‘दी एक्झिकॉन ग्रुपच्या माध्यमातून ग्लोबल कोकण फेस्टिव्हल अधिक प्रभावी होण्यास व अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल. तसेच कोकणाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही एकत्र येऊन करत आहोत. या समन्वय करारांतर्गत आम्ही देश-विदेशातदेखील अशा कार्यक्रमांचे आयोजन करणार आहोत.’

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link