Next
लक्ष्मीपूजनासाठी वैष्णोदेवीचे चित्र असलेल्या नाण्यांचा शोध
प्रशांत सिनकर
Friday, November 02 | 12:58 PM
15 0 0
Share this story

ठाणे : बाजारात नवीन चलनी नोट अथवा नाणे आले, की ती जमवण्याचा अनेकांना छंद असतो; मात्र काही नाणी इतकी विशेष असतात, की एरव्ही छंद नसलेल्या व्यक्तीही ती गोळा करून ठेवतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने काढलेली पाच आणि दहा रुपयांची वैष्णोदेवीचे चित्र असलेली नाणी त्यापैकीच आहेत. अनेकांना दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी हीच नाणी हवी असतात. म्हणून ती नाणी जेव्हा मिळतील, तेव्हा बाजूला ठेवली जातात. ज्यांच्याकडे अशी नाणी नाहीत, त्यापैकी अनेकजण आता ही नाणी शोधत आहेत.

लक्ष्मीपूजनासाठी देवीचे नाणे मिळावे यासाठी ग्राहकांबरोबर दुकानदारदेखील या नाण्यावर नजर ठेवून आहेत. दिवाळीत लक्ष्मीच्या मूर्तीबरोबर सोन्या-चांदीच्या नाण्यांवरील लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. २०१२मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने पाच रुपये आणि दहा रुपयांचे देवीचे चित्र असणारे नाणे चलनात आणले. श्री माता वैष्णोदेवी साइन बोर्ड असा उल्लेख आणि वैष्णोदेवीचे चित्र या नाण्यांवर आहे. हे नाणे व्यहारात कोणाला मिळाले, तर ते पुन्हा पटकन देऊन टाकले जात नाही. अनेकांनी ही नाणी जपून ठेवलेली आहेत. गेल्या काही महिन्यांत अशी नाणी बाजारात दिसणे दुर्लभ झाले असून, आता असे नाणे मिळाले की ते जपून ठेवले जाते आहे. दिवाळीत या नाण्यांना मोठी मागणी असून, अनेक ग्राहक आणि व्यापारी अशी नाणी स्वत:कडे ठेवून देत असल्याचे सांगण्यात येते.

‘दहा रुपयांच्या नाण्यावर वैष्णोदेवीचे चित्र आहे. ते आमच्यासाठी देवीचा प्रसाद आहे, असे आम्ही मानतो. असे नाणे मला किंवा कुटुंबातील कोणाला मिळाले, की ते आवर्जून जपून ठेवतो. गेल्या अनेक दिवसांपासून ही नाणी मी साठवली असून, दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या नाण्यांची माझ्या घरी पूजा केली जाते,’ असे संपदा टेंबे या ठाण्यातील गृहिणीने सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link