Next
राज्यस्तरीय कला उत्सवासाठी रत्नागिरीतील आठ विद्यार्थ्यांची निवड
BOI
Monday, November 12, 2018 | 05:51 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘कला उत्सव २०१८-१९’ची जिल्हास्तरीय निवड फेरी नुकतीच रत्नागिरीतील फाटक हायस्कूलमध्ये झाली. त्यातून चार कला प्रकारांतून रत्नागिरीतील आठ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

कला प्रकारनिहाय निवड झालेले विद्यार्थी असे : चित्रकला - अभिज्ञ संदीप दळी आणि नीलाक्षी सचिन पवार (दोघेही अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी); गायन - चैतन्य विराज परब (जीजीपीएस), तन्वी मंगेश मोरे (पटवर्धन हायस्कूल); वाद्यवादन- भाग्येश अविनाश गुरव (रा. भा. शिर्के प्रशाला), अनुष्का समीर आपटे (जीजीपीएस); एकल नृत्य - केतकी दिलीप गुणे (पटवर्धन हायस्कूल), युनीस युसूफ दर्वे (एम. एस. नाईक हायस्कूल). 

राज्यस्तरीय स्पर्धेकरिता विजय रानडे (जीजीपीएस) आणि सुनीता गाडगीळ (पटवर्धन हायस्कूल) हे शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून, ते त्यांच्या समवेत या स्पर्धेसाठी जाणार आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search