Next
पुण्यात २० जुलैला रंगणार ‘बरखा ऋतू’ उत्सव
प्रेस रिलीज
Monday, July 15, 2019 | 06:03 PM
15 0 0
Share this article:

पुणे : बनयान ट्री या संस्थेतर्फे शिवकुमार शर्मा, नक अभिषेकी यांच्यासमवेत ‘बरखा ऋतू’ या संगीतोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे २० जुलैला सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. वर्षाऋतूकालीन रागांची ही मैफल असून, आषाढसरींच्या साथीने संगीत रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

मागील १८ वर्षांपासून बनयान ट्रीसंस्थेतर्फे ‘बरखा ऋतू’ महोत्सव दर वर्षी विविध शहरांत दिग्गज कलाकारांसमवेत आयोजित केला जात आहे. या वर्षी पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा (संतूरवादन) आणि शौनक अभिषेकी (गायन) अशी ही मैफल रंगणार आहे.

या मैफलीला पुण्यातील संगीतरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search