Next
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला तात्काळ निधी देण्याची मागणी
BOI
Saturday, July 13, 2019 | 04:00 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर : मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन तात्काळ निधी उपलब्ध करावा व म्हैसाळ योजनेत तालुक्यातील आठ गावांचा नव्याने समावेश करण्याच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रोजी निवेदनाद्वारे केली. पंढरपूर येथे विश्रामगृहात १२ जुलै रोजी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

या वेळी शिवसेना उप-जिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, विनोद कदम, महिला आघाडी तालुकाप्रमुख आरती बसंवती आदी उपस्थित होते. तालुक्याच्या कायमस्वरूपी दुष्काळी भागासाठी २०१४ साली मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर झाल्यापासून या योजनेला निधी अथवा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. त्यामुळे या योजनेची मूळ प्रशासकीय मान्यता रद्द होण्याआधी सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच तालुका म्हैसाळ योजनेच्या शेवटच्या टोकावर आहे. या योजनेचे पाणी तालुक्यातील लवंगी, आसबेवाडी, शिवनगी, सोड्डी, सलगर (बु), सलगर (खु), येळगी या गावांच्या सीमेवरून जाते. पाण्याच्या एकेक थेंबासाठी तहानलेल्या गावांच्या सीमेवरून जाणारे पाणी मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे या आठ गावांचा नव्याने समावेश करण्याच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

याआधी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व जलसंधारण कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत आणि पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत या आठ गावांचा समावेश करण्याबाबत सहमती दर्शवण्यात आली होती. क्षेत्रीय पातळीवरून पुणे येथील कृष्णा खोरे महामंडळाला तसा प्रस्तावही सादर झाला असल्याने विभागाला तशा सूचना देण्याची मागणी शैला गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search