Next
‘सूर नवा ध्यास नवा- लिटिल चॅम्प्स’च्या ऑडिशन्स आठ जुलैला पुण्यात
प्रेस रिलीज
Monday, July 02 | 05:44 PM
15 0 0
Share this story

पुणे : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’  या कार्यक्रमाच्या पहिल्या यशस्वी पर्वानंतर आता कलर्स मराठी ‘सूर नवा ध्यास नवा-लिटिल चॅम्प्स’ घेऊन येत आहे. सहा ते १५ वर्षे वयोगटातील मुले -मुली या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील. 

या कार्यक्रमासाठी पुण्यात येत्या आठ जुलै रोजी ऑडिशन्स होणार आहेत. डी. इ. एस. सेकंडरी स्कूल, सदाशिव पेठ येथे सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत येणारे स्पर्धक निवड चाचणीसाठी पात्र ठरतील. यात जे स्पर्धक निवडले जातील त्यांना अंतिम फेरीसाठी मुंबईला बोलाविले जाईल. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन एक नवा सूर शोधण्याचा हा प्रवास सहा जुलैपासून सुरु होणार आहे. या पर्वाचा शुभारंभ ऑगस्टमध्ये होणार असून, याचे परीक्षक अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे हे आहेत. या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कोण असेल हे मात्र, सध्या गुलदस्त्यात आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link