Next
सांस्कृतिक देवाणघेवाण
BOI
Friday, November 17 | 06:45 AM
15 0 0
Share this story

विविध विषयांवरील अनेक सत्रे घेत असताना ‘आयपार इंटरनॅशनल फेस्टिव्हल’मध्ये एका सत्रात आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ते म्हणजे, ‘स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्राम.’ एक प्रकारची सांस्कृतिक देवाणघेवाण असलेल्या या  अनोख्या कार्यक्रमाबद्दल...
..............................................  
आयपार महोत्सवातील विविध कार्यक्रमांबद्दल बोलताना, ‘आयपार’चे अजय जोशी म्हणाले, ‘संस्थेच्या नावातच रिसर्च आहे. त्यामुळे केवळ नाटक करणे किंवा प्रयोग करणे या पलीकडे जाऊन ती गोष्ट ‘अकॅडमिक्स’शी कशी जोडता येईल, हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्याचाच भाग म्हणून आम्ही हा ‘स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्राम’ राबवत आहोत.’  याअंतर्गत एकूण दहा मुलांना आम्ही बोलावलं आहे. त्यापैकी चार अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी येथून, चार मुले कोलकाता येथून व दोन मुले वर्धा जिल्ह्यातून आलेली आहेत,’ अशी माहिती त्यांनी दिली. 

या कार्यक्रमांतर्गत पुण्यात दहा दिवस येऊन राहिलेल्या व महोत्सवाच्या निमित्ताने अनेक निरनिराळ्या गोष्टी अनुभवता आलेल्या काही मुलांशी संवाद साधला. या मुलांचं काय म्हणणं आहे, ते पाहू या...

अभिषेक घोष, कोलकाता 
आमच्या विभागाच्या प्रमुख प्रियांका चॅटर्जी यांच्या संदर्भाने मला इथे येण्याची संधी मिळाली. थिएटर हे केवळ गोष्टीभोवती फिरत नाही, तर ते पात्राच्या अंतर्गत कथेभोवतीदेखील फिरत असते, ही गोष्ट मला इथे आल्यावर शिकायला मिळाली. तसेच एखाद्या नाटकाकडे पाहण्याचा प्रत्येक प्रेक्षकाचा दृष्टिकोन वेगळा असतो व तो त्याच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित असतो, हेदेखील मला शिकायला मिळाले. नाटकातील पात्रांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला.  कलेची भाषा समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीतून एकत्र आलेले लोक, हा या फेस्टिव्हलचा एक खूप छान भाग वाटला. एक कलाकार, तसेच एक माणूस म्हणूनदेखील या फेस्टिव्हलने मला खूप काही दिले. 

शोएब आलमशोएब आलम, अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी
मी अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी येथे पीएचडीचे शिक्षण घेत असून, माझ्या सुपरवायझरच्या माध्यमातून मला या फेस्टिव्हलबद्द्ल माहिती मिळाली. इथे पाहायला मिळालेली सर्वच सादरीकरणे जबरदस्त होती. प्रत्येक नाटकाने काही ना काही नवीन दिले. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांनी घेतलेल्या कार्यशाळांमधून खूप शिकायला मिळाले. त्याचा प्रत्यक्षात वापर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. त्याचबरोबर सादरीकरणानंतर घेण्यात येणाऱ्या चर्चेतूनही अनेक गोष्टी समजल्या. प्लॅटफॉर्म परफॉर्मन्सेसदेखील उत्तम होते. एकूणात हा रसरशीत असा अनुभव या फेस्टिव्हलच्या निमित्ताने मिळाला. 

प्रितेश पांडेप्रितेश पांडे,  वर्धा
वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय येथे मी शिकतो. डॉ. सतीश पावडे यांनी या महोत्सवासाठी माझे नाव सुचवले. येथे येऊन मला शिकायला मिळालेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कल्पनाशक्ती. त्याशिवाय कलाकार पंगू असतो, असे मला वाटते. मी येथे शिकायला मिळालेल्या सर्व गोष्टी अंमलात आणाण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. ‘स्विंग ऑफ लव्ह’ व ‘चिल्लरा सामरम’ ही दोन नाटके मला विशेष आवडली. या एक्स्चेंज प्रोग्रामचा मला सर्वांत जास्त आवडलेला भाग म्हणजे येथे येऊन मला अनेक वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या आणि निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांशी बोलता आले. अनेक गोष्टी जाणून घेता आल्या. तसेच नाटकातील वेगवेगळे जॉनर्स सातत्याने पाहता, अनुभवता आले. मलाही माझ्या भागात असा फेस्टिव्हल आयोजित करायला नक्कीच आवडेल. मी थिएटर या विषयात एमफिल करतो आहे, त्यातदेखील अनेक गोष्टी मला वापरता येऊ शकतील, असे मला वाटते. 

- आकाश गुळाणकर
ई-मेल : akash.gulankar@gmail.com

(‘आयपार महोत्सवा’चे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील वार्तांकन वाचण्यासाठी https://goo.gl/12cDAa येथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link