Next
‘कीजेन’ आणि ‘महिंद्रा अॅग्री’ यांची भागीदारी
प्रेस रिलीज
Thursday, July 25, 2019 | 03:12 PM
15 0 0
Share this article:

नेदरलँड/भारत : पिकांच्या बाबतीत नवकल्पना राबवणारी नेदरलँड, अमेरिका व भारत येथे कार्यरत असणारी ‘कीजेन’ कंपनी आणि महिंद्रा अॅग्री सोल्युशन्स लिमिटेड (एमएएसएल) यांनी प्रमुख पिकांसाठी विविध वर्षांची संशोधन भागीदारी केल्याचे जाहीर केले.

आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या व बाजाराच्या दृष्टीने उपयुक्त पद्धती विकसित करण्यासाठी ‘कीजेन’च्या पीकविषयक नावीन्य सुविधांचा वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानविषयक सहयोगामुळे पिकाचे अतिशय उत्पादक व अधिक लवचिक प्रकार तयार केले जातील आणि त्यामुळे फार्मटेक प्रॉस्परिटी हे ‘महिंद्रा’चे आश्वासन पूर्ण करण्यासाठी मदत होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘एमएएसएल’च्या प्रोप्रायटरी जर्मप्लाझ्ममध्ये दुष्काळ व ऊन अशा अजैव ताणांपासून आणि कीटक व आजार अशा जैव ताणांपासून पिकांचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी या भागीदारीची मदत होईल.

या नव्या भागीदारीविषयी बोलताना ‘एमएएसएल’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शर्मा म्हणाले, ‘‘एमएएसएल’मध्ये आम्ही फार्मिंग ३.० या अत्याधुनिक फार्मिंगसाठी प्रयत्नशील असून, यात शाश्वत जागतिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कस्टमाइज्ड उत्पादने व उपाय यांद्वारे संपूर्ण शेती व्यवस्थेमध्ये परिवर्तन आणण्यासाठी विविध प्रकारच्या प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. पिकाच्या बाबतीत नावीन्य आणण्यामध्ये ‘कीजेन’ जगभर आघाडीवर आहे आणि भारतासाठी व अन्य नव्या ठिकाणांसाठी अत्यंत उत्पादक व अधिक लवचिक पिके विकसित करण्यासाठी कंपनीच्या क्षमतांचा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व सुविधांचा लाभ घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. हा जागतिक सहयोग दोन्ही कंपन्यांसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास आहे.’

‘‘एमएएसएल’ची शेतकऱ्यांसाठीची बांधिलकी कौतुकास्पद आहे आणि अद्ययावत ब्रीडिंग तंत्रज्ञान व सक्षम जर्मप्लाझ्म पाया या आधारे नावीन्यपूर्ण सेवा सादर करण्याच्या बाबतीत कंपनीला आघाडीची ठरवणारी आहे. ‘एमएएसएल’बरोबर हा प्रवास सुरू करण्यासाठी आणि आमचे प्रोप्रायटरी तंत्रज्ञान व ज्ञान यांचा वापर करून त्यांच्या ब्रीडिंग कार्यक्रमांना चालना देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. यामुळे नॉन-जीएम पीक प्रकार सुधारण्यासाठी, तसेच भारतात व आशियात एमएएसएल व्यवसाय वाढवण्यासाठी मदत होईल,’ असे ‘कीजेन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जेन वान यांनी सांगितले.

या सहयोगामुळे ‘एमएएसएल’ला जुन्या व नव्या बाजारांत वाढ साधणे शक्य होईल; तसेच विशिष्ट पिकांच्या बाबतीत दर्जेदार हायब्रिड देता येतील. यामुळे कंपनीच्या बियाणे व्यवसायातही वाढ होईल. यामुळे फार्मटेक प्रॉस्परिटी साध्य करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत होईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search