Next
‘अपोलो’मध्ये ७८ वर्षीय वृद्धावर ट्रान्सक्युटेनिअस हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट यशस्वी
प्रेस रिलीज
Thursday, May 09, 2019 | 04:10 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : बायपास सर्जरीची हिस्ट्री अशा काही आरोग्याच्या समस्यांमुळे ओपन हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी करणे शक्य नसलेल्या एका ७८ वर्षीय पुरुष रुग्णावर नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्समध्ये ट्रान्सकॅथेटर ऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट हे पर्क्युटेनिअस उपचार यशस्वीपणे करण्यात आले. रुग्ण चांगल्या प्रकारे रिकव्हर झाला असून, लवकरच त्यांना रुग्णालयातून घरी सोडले जाईल. 

नवी मुंबईतील नेरुळ येथे राहणाऱ्या या रुग्णाला गेले सहा महिने, थोडी हालचाल केली, तरी श्वसनाचा तीव्र स्वरूपाचा त्रास होत होता व यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला होता. त्यांनी अपोलो हॉस्पिटल्समधील कार्डिऑलॉजिस्टचा सल्ला घेतला. तेथे त्यांना तीव्र ऑर्टिक व्हॉल्व्ह स्टेनॉसिसचे निदान झाले. वयामुळे व आरोग्याच्या समस्यांमुळे दुसरी सर्जरी करणे त्यांच्यासाठी अतिशय धोकादायक होते; परंतु, ट्रान्सकॅथेटर ऑर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशनमुळे (टीएव्हीआर) अशा रुग्णांसाठी नवी आशा निर्माण झाली आहे.

‘टीएव्हीआय’ असेही म्हटले जाणाऱ्या ‘टीएव्हीआर’मुळे, सर्जरीसाठी साजेसे नसलेल्या किंवा सर्जरी अतिशय धोकादायक ठरेल, अशा रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले आहे. पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीमध्ये, हृदयावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्जनना स्टर्नमद्वारे कापून चेस्ट कॅव्हिटी खुली करावी लागते. ‘टीएव्हीआर’ हे नॉन-सर्जिकल तंत्र असून, त्यामध्ये स्कॅल्पेलऐवजी त्वचेच्या नीडल-पंक्चरग्वारे हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेस केले जातात.

अपोलो हॉस्पिटल्सचे इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजीचे कन्सल्टंट डॉ. संजीव कालकेकर म्हणाले, ‘‘टीएव्हीआर’मध्ये ग्रॉइनमधून हृदयामध्ये कॅथेटर, बारिक लवचिक नळीद्वारे मिनिएचराइज्ड व्हॉल्व्ह बसवला जातो. अगोदरच्या ऑर्टिक व्हॉल्व्हच्या जागी ऑर्टाच्या बेसवर व्हॉल्व्ह बसवला जातो. त्यानंतर डॉक्टर फुगा उघडतात व त्यामुळे व्हॉल्व्हमध्ये हवा भरून तो जुन्या व्हॉल्व्हमध्ये बसवला जातो आणि स्टेनॉसिस वा नॅरोइंग यावर मात केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया सर्वसाधारण अनेस्थेशियाखाली किंवा सौम्य सिडेशनखाली केली जाते. यासाठी अंदाजे एक तास लागतो. या तुलनेत, ओपन हार्ट सर्जरीसाठी पाच ते सहा तास लागतात.’

भारतात व्हॉल्व्ह डिसिज असणाऱ्या रुग्णांसाठी टीएव्हीआर परिवर्तक ठरणार आहे. पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीच्या तुलनेत खर्च अधिक असला तरी त्याचे फायदे अद्वितीय आहेत. अत्यंत जोखीम असणारे किंवा इनऑपरेबल असणारे, असे अगोदर वर्गीकरण करण्यात आलेल्या व तीव्र ऑर्टिक व्हॉल्व्ह स्टेनॉसिस असणाऱ्या रुग्णांसाठी ‘टीएव्हीआर’मुळे प्रभावी उपचार करता येतात व निरोगी जीवन जगण्याची दुसरी संधी त्यांना दिली जाते. ‘टीएव्हीआर’ अशा इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजी पद्धतींमुळे ७८-८० वर्षे वयावरील रुग्णांनाही आता दर्जेदार जगण्याची संधी मिळाली आहे. तीव्र कार्डिआक धोका असणाऱ्या अनेक रुग्णांना इंटरव्हेन्शनल पद्धतींमुळे मदत होऊ शकते.

७८ वर्षीय रुग्णामध्ये चांगली सुधारणा दिसते असून, उपचारानंतर त्यांनी ४५ मिनिटांमध्ये बोलायला सुरुवात केली आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

अपोलो हॉस्पिटल्सचे सीनिअर इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजिस्ट डॉ. सई सतीष म्हणाले, ‘ओपन हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी करण्यासाठी साजेशा नसणाऱ्या रुग्णांसाठी ‘टीएव्हीआर’ हे वरदान आहे. व्हॉल्व्ह डिसिजचेच एक सर्रास आढळणारे स्वरूप म्हणजे त्याचा ऑर्टिक व्हॉल्व्हच्या लीफलेट्सवर (रक्ताच्या प्रवाहामुळे जो भाग उघडतो व बंद होतो) परिणाम करणारे कॅल्किफिकेशन. १० ते १५ वर्षे मेद साचल्याने लीफलेट्सवर परिणाम होतो. तेथे सूज व कठीणपणा निर्माण होतो. वयाच्या ७०-७५ वर्षांनंतर केवळ रुग्णांमध्ये लक्षणे दिसू लागतात. या वयात ३५ टक्के रुग्णांवर सर्जरी करता येत नाही. उपचार केले नाहीत, तर त्यातील ५० टक्के रुग्ण एका वा दोन वर्षांहून अधिक काळ जगू शकत नाहीत. ‘टीएव्हीआर’मुळे रुग्णाचे आयुर्मान आठ  ते नऊ वर्षांनी वाढते. आतापर्यंत, भारतात या उपचाराला यश मिळण्याचे प्रमाण अंदाजे ९५ टक्के आहे.’

अपोलो हॉस्पिटल्सचे सीओओ संतोष मराठे म्हणाले, ‘आरोग्याच्या गुंतागुंतीच्या समस्या असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने नवी मुंबई विभागातील आरोग्यसेवेचा चेहरा बदलतो आहे. ऑपरेशन करता न येणाऱ्या रुग्णांवर किंवा उच्च धोका असणाऱ्या रुग्णांवर, हार्ट ट्रान्सप्लांटसह ऑर्गन ट्रान्सप्लांट, मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी ते इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजीपर्यंत, नव्या तंत्रज्ञानाच्या अद्वितीय फायद्यांमुळे प्रभावी उपचार करता येणार आहेत व त्यांना निरोगी जीवन जगण्याची दुसरी संधी मिळणार आहे.’

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search