Next
‘एआरएआय’ प्रमाणित गॅस जनरेटर्सच्या शृंखलेची सरुवात
प्रेस रिलीज
Friday, April 20 | 05:16 PM
15 0 0
Share this story

सातारा : कूपर कॉर्पोरेशन या भारतातील आघाडीच्या इंजिन उत्पादकांपैकी एक असलेल्या कंपनीने बाजारपेठेत प्रथमच ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) प्रमाणित, तसेच गॅसवर चालणाऱ्या जनरेटर सेट्सची (जेनसेट्स) शृंखला सुरू केली असून, ही शृंखला १० -२५ केव्हीएची आहे.

ही शृंखला भारत सराकारच्या केंद्रीय प्रदूषण निंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या प्रदूषण नियंत्रणाच्या निकषांनुसार आहे. हे नियम भारतातील सर्व जनरेटर सेट्सचे उत्पादन, आयात करणारे व्यापारी किंवा जोडणी करणाऱ्या सर्वांना लागू करण्यात आले असून, यामुळे प्रदूषण कमी करण्याचे निकषही पाळले जाणार आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नवीन निकषानुसार आता कूपर कॉर्पोरेशन आपल्या डिझेलवर चालणाऱ्या जेनसेट्च्या शृंखलेबरोबरच नैसर्गिक वायू-एलपीजीवर चालणारे सेट्स सुरू करू शकणार आहे. हे जेनसेट्स या नवीन निकषांनुसार आहेत.

‘कूपर’ची इंजिन्स ही अधुनिक तंत्रज्ञानातही आघाडीवर असून, त्याचबरोबर आता त्यांच्या उत्पादन शृंखलेत गॅसच्या उत्पादनांची भर पडली आहे. परिणामी देशांत क्लिन बॅकअप-प्राईम पावरचे युग अवतरले आहे. ‘कूपर’तर्फे येत्या काही महिन्यांमध्ये ‘एआरएआय’ प्रमाणित अशा २५० केव्हीपर्यंतच्या गॅस इंजिनावर चालणाऱ्या जनरेटर्सची सुरूवात करण्यात येणार आहे.

या इंजिनांचे डिझाईन हे नैसर्गिक वायू-एलपीजीवर चालण्यासाठी केले असून, परंपरागत उपकरणांना हा चांगला पर्याय ठरत आहे. कमी धूर सोडत असल्यामुळे त्याचबरोबर कमी खर्च व कमी आवाज हे यांचे फायदे आहेत. परिणामी हे जेनसेट्स दिल्ली-एनसीआरसारख्या उर्जेची चणचण असणाऱ्या विभागासाठी वरदान ठरेल कारण या भागात प्रदुषणाचेही प्रमाण अधिक आहे.  

या विषयी अधिक माहिती सांगतांना ‘कूपर’चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक फारोक कूपर म्हणाले, ‘आमचा असा विश्वास आहे, की नवीन ‘सीपीसीबी एमिशन’चे निकष आहेत ते खूप चांगले आहेत. कारण यामुळे भारतीय इंजिने ही भारतातील स्वच्छ उर्जा देण्याच्या चळवळीला योगदान देतील व युरोप आणि अमेरिकेतील निकषांशी स्पर्धा करू शकतील. बाजारपेठेत प्रथमच गॅस जेनेसेटसुध्दा सुरू करण्यास सक्षम झाल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.’

‘आम्ही नेहमीच इंजिनीअरिंगमधील कौशल्ये, नवीन तंत्रज्ञानात वेळोवेळी गुंतवणूक करून नवीन निकषांनुसार उत्पादने तयार करून वेळेच्या आधी काम करण्यावर भर देत असतो. परिणामी एआरएआय प्रमाणित गॅस जेनसेट्स या उत्पादनामुळे आम्हाला अधिक आत्मविश्वास वाटू लागला आहे,’ असेही कूपर म्हणाले.

‘कूपर’चे गॅस जेनेसेट हे घरे, फार्महाऊसेस, बंगले, हॉटेल्स, रिटेल आऊटलेट्स, आयटी कार्यालये, टेलिकॉम टावर्स आणि हॉस्पिटलांसह विविध ठिकाणी उपयुक्त आहेत. या गॅस जेनसेट्सचे उत्पादन हे कंपनीच्या सातारा येथील उत्पादन केंद्रात करण्यात येणार असून, ते देशभरांतील ८० डिलर्स आणि २०० टच पॉईंट्सच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहेत.

‘कूपर’च्या इंजिनांचा व्यवसाय हा एकूण उलाढालीच्या १५ टक्के असून तो मध्यम कालावधीत (तीन ते पाच वर्ष) २५ टक्के ‘सीएजीआर’ने वाढत आहे. कंपनीतर्फे इंजिने आणि जेनसेट्सची निर्यात दक्षिण पूर्व एशिया, मध्यपूर्व, अफ्रिका, सौदी अरेबिया, रशिया, युक्रेन आणि मध्य अमेरिका या देशांत केली जाते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link