Next
‘लेक माझी लाडकी’च्या सेटवर वडापावची मेजवानी
प्रेस रिलीज
Friday, July 06, 2018 | 02:06 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेतील कलाकार कुटुंबाप्रमाणे असतात. इतर कुटुंबात जितक्या गंमतीजमती होतात, तशाच त्या मालिकांच्या सेटवरही होतात. नुकतीच ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेच्या सेटवर वडापावची मेजवानी झाली. रिमझिम पाऊस आणि गरमागरम वडापाव असा बेत जमून आला.

‘लेक माझी लाडकी’ ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता ‘स्टार प्रवाह’वर दाखविली जाते. अभिनेता अविनाश नारकर यांनी पुढाकार घेऊन ही वडापाव पार्टी जमवून आणली. ऐश्वर्या नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश नारकर यांच्यासह आशुतोष कुलकर्णी, सायली देवधर, विकास पाटील यांनीही हातभार लावला. त्यामुळे मालिकेच्या सेटवरच्या सगळ्यांनाच गरमागरम वडापावचा आस्वाद घेता आला. या पूर्वी ऐश्वर्या नारकर यांनी सेटवरच नारळाच्या वड्याही केल्या होत्या.

‘छान पाऊस पडत असताना वडापाव खाण्याची इच्छा झाली. विकत आणण्यापेक्षा आपणच सेटवर करू म्हणून वडे करण्याचा घाट घातला. बाकी सगळ्यांनीही ही कल्पना उचलून धरली आणि उत्साहाने मदतही केली. या वडापाव पार्टीमुळे सेटवर सगळेच खूश झाले,’ असे अविनाश नारकर यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search