Next
चैतन्य महाराजांच्या पालखीचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश
BOI
Saturday, July 21, 2018 | 11:35 AM
15 0 0
Share this article:



सोलापूर :
संत चैतन्य महाराजांच्या दिंडीने शुक्रवारी (२० जुलै) रोजी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. रोपळे बुद्रुक गावात या पालखी सोहळ्याचा शेवटचा मुक्काम होता. तिथून शनिवारी (२१ जुलै) पहाटे हा पालखी सोहळा ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करत पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. बैलजोडीसाठी प्रसिद्ध असलेल्या उदापूर गावातील गणेश महाराज शिंदे यांच्या बैलजोडीला यंदा रथाचा मान मिळाला. 

चैतन्य माहाराजांच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे ५८वे वर्ष आहे. उदापूर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथून हा पालखी सोहळा अहमदनगरमार्गे पंढरपूरला येतो. शुक्रवारी या पालखी सोहळ्याचा १८वा मुक्काम होता. केवळ एका विणेकऱ्यावर सुरू झालेल्या या पालखी सोहळ्यात आता सुमारे एक हजार वारकऱ्यांचा सहभाग आहे. त्यात ६२५ महिला वारकऱ्यांचाही समावेश आहे. शेतीप्रधान गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदापूर गावातील प्रत्येक शेतकऱ्याने खिल्लार जातीच्या बैलजोडीचा सांभाळ केला आहे. हेच या गावाचे वैशिष्ट्य आहे. विज्ञान युगातील शेती कितीही यांत्रिक पद्धतीने केली जात असली, तरी येथील शेतकऱ्यांना शेतीची कामे बैलजोडीच्या साह्यानेच केली तर समाधान लाभते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी अस्सल खिल्लार जातीच्या गाई व बैलांचा सांभाळ केला आहे. त्यामुळे या पालखी सोहळ्याच्या रथाला गावातील शेतकऱ्यांच्या अस्सल बैलजोड्या मानाने जोडल्या जातात. या रथाला दर वर्षी नवीन बैलजोडी असते. त्यासाठी बोली बोलून बैलजोडीचा मान दिला जातो. यंदा गणेश महाराज शिंदे यांच्या बैलजोडीला रथाचा मान मिळाला आहे. विठ्ठल बाबा मांडे हे या पालखी सोहळ्याचे चालक आहेत. 

रथाच्या बैलजोडीबाबत दत्ताशेट मनाजी साळवे यांनी अधिक माहिती दिली. ‘आम्ही पंढरपूर येथील बाजारातूनच अस्सल बैलजोडीची खरेदी करतो,’ असे ते म्हणाले. हिंमत तुकाराम गगे यांनी या पालखी सोहळ्यातील परंपरेची माहिती दिली. रात्रीच्या मुक्कामात श्रींची आरती व हरिकीर्तनाचा कार्यक्रम झाला. शनिवारी पहाटे या पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

( चैतन्य महाराजांच्या पालखीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search