Next
तिवारी आणि गुलाठी यांची ‘एमसीएमसी’ला भेट
प्रेस रिलीज
Wednesday, April 10, 2019 | 03:58 PM
15 0 0
Share this article:



पुणे : जिल्‍ह्यात लोकसभा निवडणुकांची माहिती प्रसारमाध्‍यमांना उपलब्‍ध व्‍हावी, यासाठी स्‍थापन केलेल्‍या मीडिया सेंटरला, तसेच जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीला (मीडिया सर्टिफिकेशन अॅंड मॉनिटरिंग कमिटी- एमसीएमसी) निवडणूक खर्च निरीक्षक सौरभ तिवारी आणि प्रियंका गुलाठी यांनी भेट देऊन पाहणी केली.

या वेळी समन्‍वय अधिकारी तथा उप जिल्‍हाधिकारी सुधीर जोशी, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, तहसीलदार पल्‍लवी घाडगे, नायब तहसीलदार प्रमोद काशीकर आदी उपस्थित होते. ‘एमसीएमसी’कडून प्रमाणित करण्‍यात येणाऱ्या जाहिरातींची कार्यपद्धती, पेडन्‍यूज याबाबत त्‍यांनी माहिती जाणून घेतली.



‘नवीन मध्‍यवर्ती इमारतीमध्‍ये जिल्‍हा माहिती कार्यालयात ‘एमसीएमसी’ कक्ष स्‍थापन करण्‍यात आला असून, विहीत नमुन्‍यातील अर्ज भरून सोशल मीडिया आणि इलेक्‍ट्रॉनिक मीडियावरील जाहिरातींच्‍या प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत कार्यवाही केली जाते,’ अशी माहिती जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी या वेळी दिली. प्रमाणपत्राचा नमुना अर्ज जिल्‍हाधिकारी कार्यालयातील (कॅंटिनजवळील) तळमजल्‍यावरील मीडिया सेंटरमध्‍ये, तसेच जिल्‍हा माहिती कार्यालयात उपलब्ध असल्‍याचेही सरग यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search