Next
‘अनैसर्गिक थायरॉइड’वर ‘गोळविलकर’चा सर्व्हे
प्रेस रिलीज
Friday, March 16, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील गोळविलकर मेट्रॉपॉलिसच्या सुसज्ज केंद्रातर्फे अनैसर्गिक थायरॉइड हार्मोन यावर नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. या अंतर्गत २०१३ ते २०१७ या पाच वर्षांच्या कालावधीत ०-८० वयोगटातील केलेल्या पाच लाख ४८ हजार २५९ लोकांच्या तपासणी करण्यात आली.

या तपासणी नमुन्यांच्या डेटा विश्लेषणाने काही सत्यता समोर आणल्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे हायपोथायरॉइडिजमसाठी एकूण नमुन्यांच्या १९ टक्के नमुन्यांचे आणि हायपरथायरॉइडिजमसाठी सात टक्के नमुन्यांचे निदान सकारात्मक मिळाले आहे.  

दुसरे म्हणजे थायरॉइड अनैसर्गिकतांमध्ये ३० ते ४० वर्षे वयोगटात अंदाजे २७ टक्के एवढ्या जास्त प्रमाणामध्ये लोकांना त्रास आढळला आहे आणि २० ते ३० वयोगटात २४ टक्के लोक त्रस्त आहेत. तिसरे म्हणजे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हा त्रास जास्त होतो.

टीएसएच हा एक हार्मोन किंवा संप्रेरक आहे जो थायरॉइडच्या कामावर नियंत्रण करतो. थायरॉइड संप्रेरकाचा उत्तेजक आहे. याची निर्मिती मेंदूच्या पियुषिका ग्रंथीत होते आणि तो ट्रायोडॉथायरॉनाइन (टी३) आणि थ्रारॉक्सीनच्या (टी४) निर्मितीला प्रोत्साहन देतो. या संप्रेरकांची मात्रा आणि संतुलन शरीराच्या जवळपास सर्व शारीरिक प्रक्रियांवर, विशेषतः शरीराच्या चयापचयावर प्रभाव पाडते.

हायपोथायरॉइडिजमला अंडरअॅक्टिव्ह थायरॉइड किंवा लो थायरॉइड असेही म्हणतात आणि ही अंतर्गतस्त्राव यंत्रणेची एक समस्या आहे, ज्यामध्ये थायरॉइड ग्रंथी पुरेशा प्रमाणामध्ये थायरॉइड संप्रेरक निर्माण करत नाही. यामुळे अनेक लक्षणे निर्माण होऊ शकतात. उदा. सर्दी सहन करण्याची शक्ती कमी होणे, थकवा जाणवणे, मलावरोध होणे, नैराश्य येणे आणि वजन वाढणे. कधी-कधी गळ्याच्या पुढच्या भागामध्ये गोइटरमुळे सूजही येऊ शकते. गर्भावस्थेदरम्यान उपचार न केलेल्या हायपोथायरॉइडिजममुळे बाळाच्या किंवा क्रिटिनिजमच्या विकासाला आणि बौध्दिक प्रगतीला उशीर होऊ शकतो.  

हायपरथायरॉइडिजम ही अशी स्थिती आहे, जी थायरॉइड ग्रंथीद्वारे थायरॉइड हार्मोन किंवा संप्रेरकाच्या अति निर्मितीमुळे निर्माण होते. व्यक्तीपरत्वे संकेत आणि लक्षणे बदलू शकतात. त्यात कदाचित जळजळ, स्नायुचा थकवा, झोपण्याच्या समस्या, हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढणे, उष्णता सहन न होणे, डायरिया, थायरॉइड ग्रंथी वाढणे आणि वजन कमी होणे या गोष्टींचा समावेश होतो.

या अभ्यासाबद्दल बोलताना मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लि.चे चेअरमन डॉ. सुशील शहा म्हणाले, ‘भारतात थायरॉइड ही सर्वसामान्य समस्या आहे आणि असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, की भारतात अंदाजे ४२ लोक याने त्रस्त आहेत. संपूर्ण निदानासाठी सर्व मानकांचे मापन होणे गरजेचे आहे, ज्यात ‘टी३’ आणि ‘टी४’चा समावेश होतो. उच्च जोखीम श्रेणीतील लोकांची आणि लक्षणे आढळणाऱ्यांची चाचणी होणे आवश्यक आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link