Next
पूरग्रस्तांसाठी आवश्यक वस्तूंची मदत जमा करण्याचे आवाहन
विभागीय मदत कक्ष कार्यान्वित; हेलिकॉप्टरद्वारे वस्तू पोहोचवणार
BOI
Saturday, August 10, 2019 | 01:21 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवारा कॅम्पमधील पूरग्रस्तांसाठी तत्काळ मदत उपलब्ध करुन देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय मदत कक्ष सुरू करण्यात आला असून, मदत देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपली वस्तू स्वरुपातील मदत जमा येथे करावी,’ असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले. 

‘आर्थिक मदत करावयाची असल्यास ती मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावी. पुरवठा शाखेच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे यांच्या स्तरावर हा कक्ष कार्यरत राहणार असून, सांगली जिल्ह्यामध्ये या वस्तू वाहनाने, तर कोल्हापूरला हेलिकॉप्टरद्वारे पाठवण्यात येणार आहेत,’ असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

‘पूरग्रस्तांसाठी मदत करु इच्छिणाऱ्या व्यक्तींनी कार्यालयीन वेळेत या कक्षात वस्तू स्वरूपात मदत जमा करावयाची आहे. यामध्ये ब्लँकेट्स, सतरंजी, लहान मुलांचे कपडे, साड्या, टॉवेल, महिलांसाठी किट (साडी, परकर, टॉवेल, सॅनिटरी नॅपकीन इत्यादी); तसेच पुरुषांसाठी किट (टी-शर्ट, बर्मुडा, स्वेटर इत्यादी) लहान मुले व मुलींसाठी किट (टॉप, चड्ड्या, शॉर्टस, कानटोपी, स्वेटर) असे कपडे  स्वीकारले जातील; परंतु केवळ नवीन कपडे स्वीकारले जातील. जुने कपडे देऊ नयेत. याबरोबरच टिकाऊ अन्नपदार्थ यात बिस्कीटचे पुडे, सीलबंद खाण्याची पाकिटे, मॅगी, चहा पावडर, भडंग-मुरमुरे, ओआरएस, मेडीक्लोर, टूथपेस्ट-टूथब्रश, दंतमंजन, साबण, खोबरेल तेल, कंगवा, सॉक्स, स्लिपर, मिनरल वॉटर बॉटल, हेल्थ ड्रिंक, मेणबत्ती-काडीपेटी, मच्छर अगरबत्ती, पत्रावळी, टॉर्च अशा वस्तू स्वीकारल्या जातील. त्याचबरोबर साखर-मीठ, बेसन, गोडतेल, पीठ, तांदूळ, डाळी, कडधान्य अशा स्वरूपाचा किराणा माल देखील स्वीकारला जाईल,’ असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. 

अधिक माहितीसाठी संपर्क :  श्री. दिघे -९९२३५ ९००२१      
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search