Next
‘आयसीएआय’ पुणेच्या अध्यक्षपदी ऋता चितळे
BOI
Friday, March 01, 2019 | 05:10 PM
15 0 0
Share this story

आयसीएआय, पुणे शाखेच्या अध्यक्ष ऋता चितळे यांच्यासमवेत उपाध्यक्ष अभिषेक धामणे, सचिव समीर लढ्ढा व खजिनदार काशिनाथ पाठारे

पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सीए ऋता चितळे यांची निवड झाली आहे. २०१९-२०२० या वर्षासाठी ही निवड असून, संस्थेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. संस्थेच्या उपाध्यक्षपदी सीए अभिषेक धामणे, सचिवपदी समीर लढ्ढा, खजिनदारपदी काशिनाथ पाठारे यांची निवड झाली आहे. सीए राजेश अगरवाल, सीए अमृता कुलकर्णी, सीए अभिषेक झावरे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली आहे.

आयसीएआय पुणे शाखेची सुरुवात १९६२ मध्ये झाली. पुणे शाखेचे ७५००पेक्षा अधिक सभासद आहेत;तर २२०००पेक्षा जास्त विद्यार्थी पुणे शाखेशी संलग्नित आहेत. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या संस्थेत सनदी लेखापालांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन वर्षभर केले जाते. त्यामध्ये कार्यशाळा, चर्चासत्रे आदी गोष्टींचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link