Next
कोजागरीनिमित्त रत्नागिरीत ‘गझल कौमुदी’चे आयोजन
BOI
Monday, October 22, 2018 | 05:39 PM
15 0 0
Share this article:

सुरेश दंडेरत्नागिरी : कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून २३ ऑक्टोबर २०१८ रोजी रत्नागिरीकरांसाठी ‘गझल कौमुदी’ या सांगीतिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. यात अमरावतीचे ज्येष्ठ गायक व संगीतकार सुरेश दंडे आपली गझल गायनाची खास शैली पेश करणार आहेत.

शहरातील गाडीतळ परिसरातील पतितपावन मंदिरात रात्री साडेनऊ वाजता हा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. पंडित वसंतराव देशपांडे स्मृती पुरस्कारप्राप्त गझल नवाज दंडे हे जीवन विमा निगमचे निवृत्त अधिकारी आहेत. वडील नागपुरातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक व संगीतकार व्ही. एस. तथा बाबुराव दंडे यांच्याकडून बालपणापासूनच संगीत संस्कार त्यांच्यावर झाले.

गेल्या २५ वर्षांत आकाशवाणी, दूरदर्शनसह मराठी-हिंदी गझलचा प्रसार-प्रचार त्यांनी केला आहे. देशभर गझलवर आधारित ‘फजा-ए-गजल’, ‘स्टोरी ऑफ गजल’, ‘यादे मनशा’, ‘आइना-ए-गजल’, ‘दिलकश लम्हे’, ‘गजलों के रंग गीतों के संग’ अशा विविध शीर्षकांच्या पाचशेहून अधिक मैफिली रंगवल्या आहेत. सुरेश भट यांच्या गझलांच्या प्रसारासाठी स्वरविहार ही संस्था स्थापन करून नवोदित गायकांना ते मार्गदर्शन करतात. ऑस्ट्रेलियातील सावरकर विश्व संमेलनात त्यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. ‘तेव्हा मी नसेन’ या मराठी गाण्याच्या अल्बममध्ये सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल यांच्याबरोबर गायनाचा मानही सुरेश दंडे यांना मिळाला आहे. त्यांना औरंगाबाद, हैद्राबाद, पाँडेचरी येथील संस्थांनी विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानितही केले आहे.

रत्नागिरीतील २३ ऑक्टोबरला रंगणाऱ्या मैफलीसाठी हेरंब जोगळेकर (तबला), उदय गोखले (व्हायोलिन), संजू बर्वे (तालवाद्य) संगीतसाथ करणार आहेत. विनय परांजपे निवेदन व ध्वनिसंयोजन उदयराज सावंत करणार आहेत.

मैफलीविषयी :
दिवस :
मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१८
वेळ : रात्री साडेनऊ वाजता
स्थळ : पतितपावन मंदिर, गाडीतळ, रत्नागिरी.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search