Next
भिवंडी मनपा लेबर फ्रंट कामगार संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन
BOI
Thursday, March 07, 2019 | 03:37 PM
15 0 0
Share this article:भिवंडी : महानगरपालिका क्षेत्रातील सर्वाधिक कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लेबर फ्रंट कामगार संघटनेच्या महानगरपालिका मुख्यालय इमारतीतील कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच झाले.  

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून स्थायी समिती सभापती मदनबुवा नाईक, विरोधी पक्ष नेता शाम अग्रवाल, सभागृह नेता मतलुब सरदार, भिवंडी युनिट प्रमुख अॅड. किरण चन्ने, लेबर फ्रंट कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शाम गायकवाड, महापालिका नगरसचिव डॉ. सुनील भालेराव, शहर अभियंता एल. पी. गायकवाड, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुळे यांसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी बोलताना गायकवाड म्हणाले, ‘महानगरपालिका क्षेत्रातील सर्वाधिक कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेला झगडून कार्यालय मिळवावे लागले असून, त्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी स्थानिक कामगार प्रतिनिधींची आहे. पृथ्वी ही धार्मिक कामगारांच्या तळहातावर उभी आहे, हे ब्रीद भिवंडीसारख्या शहरास तंतोतंत लागू पडत असून, येथील बहुसंख्य लोकसंख्या कामगार वर्गातील आहे आणि त्यांना न्याय देण्याचे काम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे करावी.’स्थायी समिती सभापती नाईक शुभेच्छा देताना म्हणाले, ‘महापालिकेच्या विकासात कामगारांचे योगदान महत्त्वाचे असून, असंख्य सफाई कामगार दुर्गंधीचा सामना करीत इमानेइतबारे शहराची सेवा करीत आहेत. त्यांच्या या सेवेमुळेच लोकप्रतिनिधी शहरात सन्मानाने फिरू शकतात.’

विरोधी पक्षनेता अग्रवाल यांनी भिवंडी शहराला जलदगतीने स्वच्छतेकडे वाटचाल करणारे शहर म्हणून देशभरातून जो सन्मान मिळाला त्यामध्ये महापालिकेच्या कामगारांचे योगदान सर्वाधिक असल्याचे नमूद केले. प्रशासन व कामगार यांच्या एकत्रित प्रयत्नानेच शहराच्या विकासात भर पडणार असल्याचे ते म्हणाले.

भिवंडी मनपातील कामगारांची एकजूट करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे संघटनेचे भिवंडी युनिट सरचिटणीस संतोष चव्हाण यांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  संघटनेचे पदाधिकारी चंद्रकांत सोनावणे, विजय जाधव, नीलेश जाधव, शाम गणू गायकवाड, सुरज जाधव, तुषार शेलार यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search