Next
‘महाबँके’त स्वच्छता पंधरवडा
प्रेस रिलीज
Thursday, January 18, 2018 | 06:03 PM
15 0 0
Share this article:

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता आणि ए. सी. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत महाबँकेत १६ ते ३१ जानेवारी २०१८ यादरम्यान स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत बँक आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे तसेच बँकेच्या ग्राहकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे आवाहन बँकेच्या अधिकाऱ्यांनी या वेळी केले. स्वच्छता पंधरवडा यशस्वी होण्यासाठी बँकेच्या देशभरातील ३० अंचल कार्यालयांतर्गत सर्व शाखांमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search