Next
वॉटर कप स्पर्धेत सोलापूरची उत्तम कामगिरी
BOI
Wednesday, August 14, 2019 | 09:13 PM
15 0 0
Share this article:

सुर्डी गावाला पहिले पारितोषिक मिळाले.

सोलापूर :
पानी फाउंडेशनच्या वतीने गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेल्या चौथ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी (ता. बार्शी) गावाला राज्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तालुका पातळीवर मंगळवेढा तालुक्यातील हाजापूर गावाने प्रथम, नंदेश्वरने दुसरा, तर डोंगरगावाने तिसरा क्रमांक मिळवला. 
 
दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून अभिनेते आमीर खान यांच्या पानी फाउंडेशनच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने वॉटर कप स्पर्धा आयोजित करण्यात आली. यंदा स्पर्धेचे चौथे वर्ष होते. या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचा सहभाग उस्फूर्तपणे वाढत आहे. या वर्षी या स्पर्धेसाठी ५६ गावांनी नोंदणी केली होती. ४७ गावांतील ग्रामस्थांनी यासाठीचे प्रशिक्षण घेतले होते; पण ३९ गावांनी प्रत्यक्ष काम करण्यास सुरुवात केली. 

आठ एप्रिल ते २७ मे २०१९ असे ४५ दिवस चाललेल्या या स्पर्धेत हाजापूरने नऊ हजार घनमीटरहून अधिक पाणी साठवण्याच्या रचना श्रमदानातून तयार केल्या. लोकसहभागातून सलग समतल चर, खोल सलग समतल चर, अनघड बांध, नाला सरळीकरण आदी जलसंधारणाची कामे करण्यात आली. या स्पर्धेसाठी आमदार भारत भालके, सभापती प्रदीप खांडेकर, सांगोल्याची अस्तित्व संस्था, अहमदनगरची स्नेहालय संस्था, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, उपविभागीय अधिकारी उदय भोसले, तहसीलदार स्वप्नील रावडे, तत्कालीन गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तत्कालीन तालुका कृषीअधिकारी नामदेव गायकवाड, तालुका समन्वयक जितेंद्र गडहिरे, श्रीनिवास गंगणे, धनश्री पतसंस्थेचे शिवाजीराव काळुंगे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, दामाजी महाविद्यालय, सरकार ग्रुप आदींनी मंगळवेढा तालुक्यातील विजेत्या गावात लोकवर्गणीतून सहकार्य केले. 

(पारितोषिक वितरण समारंभाचे सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search