Next
‘जेट एअरवेज’तर्फे सहा दिवस जागतिक सवलत योजना
प्रेस रिलीज
Wednesday, September 05 | 04:15 PM
15 0 0
Share this story

मुंबई : आंतरराष्ट्रीय मार्गांवर संपूर्ण सेवा देणाऱ्या जेट एअरवेज या भारतातील एअरलाइन कंपनीने सहा दिवसांची एक खास जागतिक सवलत योजना आयोजित केली आहे. चार सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या योजनेत प्रवाशांना जेटच्या व जेटच्या सहयोगी कंपन्यांच्या जगातील कोणत्याही मार्गावर इकॉनॉमी व प्रीमिअर श्रेणीच्या भाड्यामध्ये ३० टक्क्यांपर्यंतची सवलत घेता येणार आहे. एकेरी (सिंगल) आणि परतीच्या (रिटर्न) या दोन्ही स्वरुपाच्या तिकीटांवर या ‘सेल’च्या काळात ही सवलत मिळेल.

तिकीट बुकिंगच्या सर्व माध्यमांमधून सुमारे २५ लाख सीट्सवर ही ३० टक्क्यांची सवलत येत्या सात सप्टेंबरपर्यंत प्रवाशांना घेता येईल. ‘जेट एअरवेज डॉट कॉम’ आणि एअरलाइनच्या ‘मोबाइल अॅप’मधून बुकिंग करणाऱ्यांना ही सवलत नऊ सप्टेंबरपर्यंत मिळू शकेल. ही जागतिक स्वरूपाची सवलत योजना एकेरी व परतीच्या प्रवासासाठी, तसेच प्रीमिअर व इकॉनॉमी श्रेणीसाठी मिळणार आहे.

भारतामधून तिकीटाचे बुकींग करणाऱ्यांना ‘एअरलाइन’च्या देशांतर्गत व परदेशातील ६६ पैकी कोणत्याही मार्गावर सवलत मिळेल. आखाती देशांतील शहरांमधून तिकीट घेणाऱ्यांना भारत, नेपाळ, बांगला देश, श्रीलंका व अति पूर्वेकडील देशांमध्ये जाण्यासाठी सवलत मिळू शकेल.

नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, अति पूर्व येथील प्रवासी ‘जेट एअरलाईन’च्या कोणत्याही मार्गावरील तिकीटांवर सवलत मिळवू शकतील. त्यांना केवळ टोरंटोला सवलतीत जाता येणार नाही. टोरंटो येथून तिकीट घेणाऱ्यांना अॅमस्टरडॅम आणि भारतातील कोणतेही शहर येथे ही सवलत ‘जेट एअरवेज’च्या मार्गावर मिळेल.

‘जेट एअरवेज’च्या जागतिक विक्री व वितरण विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार म्हणाले, ‘जगभरातील एवढ्या विविध ठिकाणी आकर्षक सवलतींच्या दरात जाण्याची संधी प्रवाशांना या योजनेतून मिळेलच, त्याशिवाय त्यांच्या पैशांचीही मोठी बचत होईल. जेट एअरवेजच्या एकमेवाद्वितीय अशा नेटवर्कचा व कनेक्टिव्हिटीचा, तसेच जागतिक दर्जाच्या सेवेचा अनुभवही प्रवाशांना मिळेल. अविस्मरणीय पर्यटनाचा आनंद प्रवाशांना मिळेल, अशीच ठिकाणे ‘जेट एअरवेज’ने निवडली आहेत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link