Next
सोनिया पाटील यांना ‘वॉव पर्सनॅलिटी पुरस्कार’ प्रदान
प्रेस रिलीज
Friday, December 21 | 05:42 PM
15 0 0
Share this story

पुणे : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा ब्लिस इक्विटी प्रकाशनतर्फे सन्मान करण्यात आला. यात सोनिया पाटील (पुणे) यांना ‘महाराष्ट्राचा गौरव- वॉव पर्सनॅलिटी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना प्रसिद्ध अभिनेत्री शांतीप्रिता आणि लेखक व अभिनेत्री आणि अभिनेता ओम पुरी यांच्या पत्नी नंदिता पुरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हा कार्यक्रम १८ डिसेंबर २०१८ रोजी मुंबईतील बांद्रा येथे झाला. या वेळी टेलिव्हिजन कलाकार काम्या पंजाबी, अभिनेत्री देलनाझ इराणी, क्रिएटिंग पॉसिबिलिटीज’ या स्वयंसेवी सेवी संस्थेचे संस्थापक आणि युवा लेखक ऱ्हिदम वाघोलीकर, कलाकार विकास गुप्ता, फॅशन डिझायनर रोहित वर्मा, सब्यासाची मुखर्जी यांसह विविध क्षेत्रांतील उद्योजकांची प्रमुख उपस्थिती होती.

नंदिता पुरी यांनी सोनिया पाटील या महाराष्ट्राच्या सन्मानार्थ पुरस्कारासाठी पात्र असल्याचे सांगून त्यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याचे नमूद केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सोनिया पाटील या सामाजिक कार्यकर्त्या असून, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमच्या मदतीसाठी कार्य करत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले; तसेच दिल्लीतील ‘फेस ऑफ महाराष्ट्र २०१८’च्या त्या  विजेत्या असून, त्या उद्योजकदेखील आहेत. त्या एक आंतरराष्ट्रीय हॉटेलियर, लेखक, परोपकारी, व्यावसायिक स्त्री, सामाजिक कार्यकर्ता, प्राणी कार्यकर्ता आणि सुपर मॉडेल अशा क्षेत्रांत कार्यरत आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link