Next
विजयादशमीला पुण्यात रंगला सिंदूरखेला
तृतीयपंथी, विधवा यांचाही सहभाग
BOI
Wednesday, October 09, 2019 | 04:27 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील बांगीया संस्कृती संसद संस्थेने ८०व्या दुर्गापूजा उत्सवाची सांगता विजयादशमीला सिंदूरखेला आयोजित करून केली. तृतीयपंथीयांना, तसेच विधवा स्त्रियांनाही या उत्सवात सहभागी करून घेण्यात आले होते. मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने सिंदूरखेला उत्सव साजरा झाला. 

‘तृतीयपंथीयांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळाच असतो. आज या उत्सवात आम्हाला सहभागी करून घेऊन जो सन्मान दिला आहे, त्यामुळे कुठे तरी समानता आली आहे, असे वाटते. खूप छान वाटतेय. आईला सगळी मुले सारखीच असतात. त्याचा प्रत्यय यानिमित्ताने आला. प्रेमाचा संदेश याद्वारे समाजाला मिळाला आहे. आयोजकांचे मी मनापासून आभार मानते,’ अशा शब्दात चांदनी या तृतीयपंथीयाने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

आयोजक ऱ्हिदम वाघोलीकर म्हणाले, ‘मी आधी तृतीयपंथीयांसोबत काम केले आहे. त्यांच्यावर पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे यंदा दुर्गापूजा वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा विचार समोर आल्यावर, आम्ही तृतीयपंथी आणि विधवा स्त्रियांनाही यात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला. विवाहित असो वा विधवा, रंग सर्वांसाठी सारखेच असतात. मधुमिता घोष यांच्या सहकार्याने आम्ही सिंदूरखेला या दुर्गापूजेतील महत्त्वाच्या सोहळ्यात तृतीयपंथी आणि विधवा महिलांनाही आमंत्रित केले. अत्यंत उत्साहाने त्यांनी या सोहळ्याचा आनंद घेतला’.

(सिंदूर खेला उत्सवाची झलक दाखविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search