Next
‘सीएलपी इंडिया’ची ‘सुझलॉन’शी भागीदारी
प्रेस रिलीज
Wednesday, September 12, 2018 | 11:49 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतातील ऊर्जा क्षेत्रातील एक सर्वात मोठी परकीय गुंतवणूकदार सीएलपी इंडिया आणि भारतातील सर्वात मोठी अपारंपरिक ऊर्जा कंपनी सुझलॉन यांनी महाराष्ट्रातील धुळे येथे ५० मेगावॅट व २० मेगावॅट क्षमतेच्या दोन सौरऊर्जा प्रकल्पांसाठी संयुक्त भागीदारी केल्याची घोषणा केली आहे.

सीएलपी इंडिया व सुझलॉन समूह यांनी १० सप्टेंबर २०१८ रोजी केलेल्या करारानुसार, सुझलॉनने तयार केलेल्या गेल सोलारफार्म्स लिमिटेड व टोर्नाडो सोलाफार्म्स लिमिटेड या दोन स्पेशल पर्पज व्हेइकल्समध्ये (एसपीव्ही) सीएलपी इंडियाने ४९ टक्के हिस्सा संपादित करण्यास सहमती दर्शवली आहे. भविष्यात उर्वरित ५१ टक्के हिस्सा घेण्याचा पर्यायही सीएलपी इंडियाकडे असणार आहे. अगोदरच कार्यान्वित केलेल्या या प्रकल्पांसाठी सर्वंकष ऑपरेशन व देखभाल सेवा देण्याची जबाबदारी सुझलॉनची असणार आहे.  

सीएलपी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव मिश्रा म्हणाले, ‘गेल्या १६ वर्षांत, आम्ही देशात अत्यंत वैविध्यपूर्ण इंधनांचा संमिश्र पोर्टफोलिओ साध्य केला आहे आणि आता सरकारच्या अनुकूल धोरणांच्या पाठिंब्याने अपारंपरिक ऊर्जा पोर्टफोलिओमध्ये विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पवन ऊर्जेमुळे आम्हाला जवळजवळ एक हजार मेगावॅट उर्जेपर्यंत वाढ करता आली आणि सौरऊर्जा क्षेत्रातही आम्ही विस्तार करू शकू, याची खात्री आहे. महाराष्ट्रात आमचे दोन पवन ऊर्जा प्रकल्प आहेत व आता राज्यात दोन सौर ऊर्जा प्रकल्पांचा समावेश करताना आनंद होत आहे.’

सीएलपी इंडियाचे बिझनेस डेव्हलपमेंट अँड कमर्शिअलचे (अपारंपरिक) संचालक महेश मखिजा म्हणाले, ‘आमच्या वाटचालीमध्ये अपारंपरिक ऊर्जा हा महत्त्वाचा स्तंभ राहिला आहे. आमच्या मते, गेल्या काही वर्षांत अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये परिवर्तन झाले आहे. व्यवसाय करण्यामध्ये सुलभता येईल, अशा अनेक सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पद्धतींचा समावेश झाला आहे व आणखी गुंतवणुकीला चालना मिळाली आहे. या क्षेत्रामध्ये प्रचंड क्षमता आहे आणि आम्ही यापुढेही शाश्वत प्रकल्पांचे मूल्यमापन करणार आहोत.’

‘पवन व सौरऊर्जा प्रकल्प या दोन्हींच्या बाबतीत आमचा सुझलॉनशी दीर्घ काळापासून सहयोग आहे. आम्ही व्हेल्तूर येथे १०० मेगावॅट प्रकल्प उभारून सौरऊर्जा क्षेत्रामध्ये प्रवेश केला. या प्रकल्पाने गुणवत्तेची सर्वोच्च प्रमाणके दर्शवल्याबद्दल त्यास नुकतेच जगातील पहिले सौर प्रकल्प गुणवत्ता प्रमाणपत्र देण्याक आले. आमचे सर्व प्रकल्प उत्तमरित्या कार्यरत राहतील, असा विश्वास आम्हाला आहे,’ असे मखिजा यांनी सांगितले.

सुझलॉन समूहाचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी जे. पी. चलसानी यांनी सांगितले, ‘महाराष्ट्रातील या दोन सौर प्रकल्पांसाठी सीएलपी इंडियाबोबर भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भारतातील पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये आम्ही प्रवर्तक आहोत आणि गेल्या दोन दशकांमध्ये आम्ही या क्षेत्रात यशस्वी कामगिरी व नेतृत्व बजावले आहे. ७० मेगावॅट क्षमतेचा स्वतंत्र सौर प्रकल्प उभारून आम्ही सौरऊर्जा क्षेत्रातील आमच्या क्षमताही सिद्ध केल्या आहेत. आम्ही या प्रकल्पासह एकूण ३४० मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प बसवले आहेत आणि संपूर्ण सोलर ऑर्डर बुक पूर्ण केली आहे.’

‘लो कार्बन असलेली अर्थव्यवस्था यामध्ये भारताचे परिवर्तन करण्यासाठी आम्ही ग्राहकांबरोबर भागीदारी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पवन व सौरऊर्जा या दोन्ही क्षेत्रांतील कौशल्य आमच्याकडे असल्याने, आम्ही विंड-सोलर हायब्रिड यातील नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी ठोस वाटचाल करत आहोत. भारतव्यापी विस्तार, सर्वंकष उत्पादने, सक्षम इन-हाउस संशोधन व विकास आणि सर्वोत्कृष्ट सेवा यामुळे आम्ही स्पर्धकांपेक्षा वेगळे आहोत,’ असे चलसानी यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search